एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही – ना. पंकजाताई मुंडे

0
690
Google search engine
Google search engine

कृषीमंत्र्यांशी केली चर्चा ; विम्याची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे यंत्रणेला आदेश

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

मुंबई दि. १६ – बीड जिल्हयातील एकही पात्र शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात कृषी मंत्री व कृषी सचिवांशी चर्चा करून त्यांनी याकडे लक्ष वेधले असता विम्याचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले.

बीड जिल्हयातील बहुतांश शेतकरी पात्र असूनही बॅकांनी काढलेल्या त्रुटींमुळे पीक विमा मिळण्यापासून वंचित झाले होते, बॅकाच्या हलगर्जीपणाचा फटका त्यांना बसल्याने संबंधित शेतक-यांची प्रकरणे रखडली होती. यासंदर्भात जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज कृषी मंत्री अनिल बोंडे व कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना सूचना करून बीड जिल्हयातील पात्र शेतक-यांची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याबद्दल आग्रही भूमिका मांडली. कृषीमंत्री बोंडे यांनी लगेचच याची दखल घेतली व जे शेतकरी विम्यापासून वंचित आहेत, अशा सर्व शेतक-यांची त्रुटी दुरूस्त करून त्यांना विम्याचा लाभ देण्याचे आदेश सचिव व संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले.

दरम्यान, शेतक-यांनी काळजी करू नये, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, जिल्हयातील एकही पात्र शेतकरी विम्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहणार नाही असे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतक-यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.