ना.धनंजय मुंडे दिलेला शब्द पाळला

0
666
Google search engine
Google search engine
आठ दिवसांत पंचायत समिती मार्फत ३९० अपंगाच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये खात्यात जमा

बीड : नितीन ढाकणे ,दिपक गित्ते

परळी वैजनाथ

दि 17——-:-  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील अपंगांना निधी वाटप करण्यात येईल असा शब्द दिला होता. दिलेल्या आश्वासनांची अवघ्या आठ दिवसांच्या आत पुर्तता केली. परळी पंचायत समिती मार्फत 390 अपंगाच्या खात्यात प्रत्येकी 500 थेट जमा केले असल्याची माहिती  पंचायत समितीच्या सभापती सौ.कल्पना मोहनराव व सौळंके, उपसभापती बालाजी पिंटू मुंडे , गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे व सर्व सदस्य, पंचायत समिती, परळी वैजनाथ यांनी दिली. त्यामुळे अपंग बांधवांकडून आनंद व्यक्त होत आहे.
    ना‌.धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे मागील आठवड्यात नगर पालिकेच्या वतीने 500 अपंगांना निधी वाटपाच्या कार्यक्रमात यांनी परळी तालुक्यातील अपंगांना ही पंचायत समिती मार्फत अनुदान देण्यात येईल. असे आश्वासन दिले होते.  ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन हा महत्त्वकांक्षी निर्णय अंमलात येत आहे.
  राज्यासह मराठवाड्यातील सर्व बीड जिल्ह्यातील दुष्काळा जन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे  अपंग लाभार्थ्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असल्यामुळे अपंगांचे चेह-यावर आनंद दिसत होता.   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अपंगांचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर पंचायत समिती मार्फत 5 टक्के अपंग निधीतून पहिल्या टप्प्यात 390 अपंगाच्या प्रत्येकी 500 रूपये जमा करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती सौ.कल्पना मोहनराव व सौळंके, उपसभापती बालाजी पिंटू मुंडे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे व सर्व सदस्य पंचायत समिती, परळी वैजनाथ यांनी दिली.
 परळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले. यापूर्वी अपंगाना निधी या आगोदर सर्वप्रथम परळी तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने 29 लाख रुपयांचा निधी वाटप केला होता.
 परळी तालुक्यातील अपंग, विधवा आणि माजी सैनिक संघटनेने ना.धनंजय मुंडेंसह सर्व मान्यवरांचे आभार मानले.