खडक्याचे पाणी परळीला यावे यासाठी धनंजय मुंडे यांचेच प्रयत्न

0
650

पाणी येण्याआधीच पालकमंत्र्यांचा श्रेयाचा केविलवाणा प्रयत्न

बीड : नितीन ढाकणे ,दिपक गित्ते

परळी वै. दि.18……. वाण धरण कोरडे पडल्याने परळी च्या जनतेला पिण्यासाठी खडक्याच्या प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह नगर पालिका, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पदाधिकारी मागील 3 महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्यांनी हे पाणी परळीकरांना मिळू नये यासाठी प्रयत्न केले, त्याच पालकमंत्री पाणी येण्याची चिन्ह दिसू लागताच त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टिका पाणी पुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भाऊसाहेब कराड यांनी केली आहे.

परळी शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण 100 टक्के कोरडे पडल्याने मागील 6 महिन्यांपासून परळीत पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खडका येथून परळीला पाणी मिळावे यासाठी धनंजय मुंडे प्रयत्नशील आहेत, त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकवेळा पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसने या मागणीसाठी तहसिल कार्यालावर मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी यासाठी न्यायालयीन लढाई लढली तर माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी उपोषणही केले.

राष्ट्रवादीच्या या प्रयत्नानंतर पाणी सोडण्याच्या हालचाली दिसू लागताच यात आडकाठी आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना 18 दिवसांच्या रजेवर पाठवले. त्यामुळे हा प्रश्न मिटण्यास विलंब लागला. ही वस्तुस्थिती असताना काल पालकमंत्र्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून 15 दिवसात पाणी येणार अशी घोषणा केली.

पाणी येणार यात कोणतेही दुमत नाही मात्र ते तुमच्यामुळे नाही तर धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे येणार असल्याचे सौ. कराड मिळाल्या.

निवडणूकीच्या तोंडावर पाण्याचे आयते श्रेय घेण्यापेक्षा परळीची जनता पाण्या साठी वणवण करत असताना पालकमंत्र्यानी इथल्या आमदार म्हणून त्यांनी काय केले याचा हिशोब द्यावा, एक तरी टँकर लावले का बोअर घेतला ? असा सवाल केला.

निवडणूक आल्यावर आता परळीकरांची आठवण आली का ? असेही कराड म्हणाल्या.