जेसीआय अकोटच्या आवो झुमे नाचे नृत्य स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद आकोटः संतोष विणके

0
709

जेसीआय अकोटच्या आवो झुमे नाचे नृत्य स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

आकोटः संतोष विणके

एकता ज्वेलर्स प्रस्तुत आवो झुमे नाचे सामूहिक नृत्य स्पर्धा
दिनांक १४ सप्टेंबर २०१९ झुनझुनवाला अतिथीगृह येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडली.या स्पर्धेस महीलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी मंचावर जेसीआय चे अध्यक्ष जेसी निलेश हाडोळे, झेडव्हीपी जेसी प्रशांत खोडके, सप्ताह प्रमुख अतुल भीरडे, झोन कोआॅररडीनेटर जेसी अशोक गट्टाणी
जेसिरेट विंग चेअरपर्सन दिपाली कडू ,प्रकल्प प्रमुख पूजा मिरकुटे तसेच प्रथम महिला ममता हाडोळे सचिव वैशाली शेगोकार, आओ झूमे नाचे या प्रकल्पाचे प्रायोजक एकता ज्वेलर्स चे संचालक सुरेशजी अटलानी त्यांच्या पत्नी संगीता अटलानी व धनवंत्री बाई अटलानी हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्या ने झाली. समूह नृत्य स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली होती पहिल्या गटात युवती तर दुसऱ्या गटात महिलांचा सहभाग होता जवळजवळ वीस गट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये मुलींच्या गटातून पहिला क्रमांक कला संस्कार दर्यापूर चा आला तर दुसरा क्रमांक आस्की , किड्स चा महिलांमध्ये पहिला क्रमांक रंगीलो राजस्थान तर दूसरा क्रमांक , सावित्रीच्या लेकी यांचा आला. विजेत्या गटा ना विद्यांचल द स्कूल यांचा तर्फे रोख बक्षिसे देण्यात आली . वह जेसीआय मार्फत मोमेंटो व सर्व स्पर्धकांना प्रमाण पत्रे देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण प्रेरणा प्रधान मॅडम आणि रवि अंभोरे सर यांनी केले त्यानंतर त्यांना सहकार्य जेसीरेट स्मिता चावड़ा व ममता टावरी यानी केले. जवळपास ८० स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होते तसेच जवळ जवळ 3000 दर्शकांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती.
कार्यक्रमांतर्गत जेसी रेट महिलांनी सुंदर अशी नाटिका सादर केली यामध्ये पास्ट चेअर पर्सन राजश्री बाळे ममता टावरी व पल्लवी गणगणे ह्या होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पास्ट चेअर पर्सन स्वाती वासे व अरुणा खोडके यांनी केले
जेसीआय ने हा कार्यक्रम महिला व युवती मधील सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच समाजामध्ये कला सादर करण्याची, संधि जेसीआय ने उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमासाठी सर्व जेसीआयचे पास्ट प्रेसिडेंट, पास्ट चेअर पर्सन सर्व जेसीमेंबर, सर्व जेसी रेट महिला, सर्व जेसीलार्ड, जेसीलेट
यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले असे जेसी निलेश इंगळे कळवतात.