चांदुर बाजार तालुक्यातील कोदोरी येथील वाळू घाट मधून वाळूची तस्करी महसूल विभाग मात्र अनभिज्ञ ,राजकीय व्यक्ति याचा ट्रॅक्टर असल्याची चर्चा. चांदुर बाजार:-

0
833
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यातील कोदोरी येथील वाळू घाट मधून वाळूची तस्करी
महसूल विभाग मात्र अनभिज्ञ ,राजकीय व्यक्ति याचा ट्रॅक्टर असल्याची चर्चा.

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आता नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चा साठा जमा झाला आहे. यातच या वाळू वर तस्करी करणारा यांचा सुद्धा डोळा आहे.या मध्ये रात्रीला या ठिकाणावरून वाहतूक केली जाते. कोदोरी येथील वाळू घाट मधूळ अवैध पणे वाळूची तस्करी सुरू आहे.या मध्ये गावातील काही युवक यांचा सहभाग असून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू आहे.तर या बाबत मंडळ अधिकारी, तलाठी कोतवाल,हे अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.

ज्या ठिकाणी वाळू टाकायची आहे ते ठिकाणी सकाळी पाहून ठेवले जाते आणि रात्री 7 ते 8 किंवा मध्यरात्री दरम्यान त्या ठिकाणी अवैध पाने वाळूची चोरी करून पोचवली जाते.तर या ट्रेकटर ला कुठलाही नंबर राहत नाही.तसेच वाळू घाट मधून वाळूचा ट्रॅक्टर निघाला की त्याच्या समोर एक पांढऱ्या रंगाचे स्कूटी गाडी,त्याच्या नंतर एक डिस्कव्हर गाडी आणि काही अंतरावर ट्रॅक्टर हा त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचवला जातो.तर एक मोटरसायकल ही जसापूर या गावात अधिकारी यांच्या वर नजर ठेवून असते.त्यामुळे आता या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या कार्यवाही कोण करणार हा प्रश्न आहे.मागील 2 वर्षपासून या अवैध वाळू तस्करी सुरु आहेमात्र यावर आता पर्यत कुठलीच कार्यवाही करणयात आली नाही.सूत्रांकडून मिळलेल्या माहिती वरून हा ट्रॅक्टर राजकीय व्यक्ती चा असल्याची माहिती समजत आहे.त्यामुळे च यावर कार्यवाही झाली नसावी असाही प्रश आता चर्चेत आहे.

फोटो:-विना नंबर वाळू खाली करत असताना ट्रॅक्टर