डाक अधीक्षक बीड यांच्या वतीने वैद्यनाथ मंदिर परिसरात आधार शिबीर संपन्न

0
622
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी।परळी वैजनाथ

नितीन ढाकणे, दिपक गित्ते

दि.19 – भारतीय डाक विभागातर्फे आज वैद्यनाथ मंदिर परिसरात आधार नोंदणी शिबीर घेण्यात आले.डाक अधीक्षक बीड एस.एन.शास्त्री,डाक निरीक्षक बीड एस.एम.स्वामी यांच्या आदेशानुसार आज थर्मल पोस्ट कार्यालयाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती या शिबिरात करण्यात आली.सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात साधारण पन्नास नागरिकांनी आपली नोंदणी केली.या शिबीरासाठी जी.आर.पारीपेल्ली पोस्ट मास्टर परळी,एम.एम.चौंडे पोस्ट मास्टर परळी टी.पी.एस,पवन खरात,पी.के.चाटे डाक सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.या शिबिरासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी मंदिर परिसरात असलेल्या वाचनालयात जागा उपलब्ध करून दिली होती.