मीटर वाचकांची चुकी ग्राहकाला तब्बल  एका महिन्याचे बिल 61000 रुपये एजन्सी वर कार्यवाही साठी अभियंता यांची टाळाटाळ चांदुर बाजार 

0
941
Google search engine
Google search engine

मीटर वाचकांची चुकी ग्राहकाला तब्बल  एका महिन्याचे बिल 61000 रुपये
एजन्सी वर कार्यवाही साठी अभियंता यांची टाळाटाळ

चांदुर बाजार

ग्राहकांचे समाधान हे महावितरण कार्यलाय चे उद्देश असून ग्राहक याची मोठ्या प्रमाणात लूट चांदुर बाजार येथील मीटर वाचन करणाऱ्या एजन्सी कडून होते आहे.चांदुर बाजार तालुक्यातील नंदकिशोर शेरेकर याना एका महिण्याचे 61000 बिल देण्यात आले आहे.मात्र त्यांनी केलेल्या ऑनलाईन तक्रार नंतर हे बिल 40630 रुपये करण्यात आले.मात्र चालू मीटर बंद दाखवणाऱ्या मीटर वाचक आणि एजन्सी वर कार्यवाही करण्याची मागणी ग्राहक यांनी केली आहे.

नंदकिशोर शेरेकर ग्राहक क्रमांक 353297727460 याना एप्रिल महिन्या पर्यत योग्य बिल येत होते मात्र मे, जून,जुलै मध्ये त्यांना सरासरी 365 वीज युनिट वापर चे बिल देण्यात आले.आणि ऑगस्ट महिन्यात त्यांना जवळपास 3875 युनिट चे एकाच वेळी बिल देण्यात आले.त्यामुळे आता ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे काम महावितरण आणि एजन्सी करीत असल्याचे दिसत आहे.चालू मीटर बंद दाखवणाऱ्या मीटर वाचक याच्या वर आणि एजन्सी वर कार्यवाहीची मागणी ग्राहक करीत आहे तर या प्रसंगी वेळ प्रसंगी ग्राहक पंच याचा कडे शुद्ध जाणार असल्याचे शेरेकर याना सांगितले.तर अभियंता हे एजन्सी वर कार्यवाही टाळाटाळ करीत आहे

प्रतिक्रिया:-
ऑगस्ट महिन्या पर्यत माझ्यावर कुठलीच थकबाकी नव्हती.अचानक मला 61000 रुपये बिल आल्याने मी त्याची तक्रार केली तर बिल 40630 रुपये करण्यात आले.मात्र चालू मीटर बंद का दाखवण्यात आले याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी तसेच माझे युनिट 3 महिन्यात पर्यत सामावून ठेवून मला एकाच वेळी बिल देण्यात आले.त्यामुळे अधिकारी याच्यावर सुद्धा वरिष्ठ यांनी कार्यवाही करावी.या प्रसंगी ग्राहक मंच मध्ये जाणार आहे.
1)नंदकिशोर शेरेकर चांदुर बाजार ग्राहक

2)ग्राहक याच्या तक्रार वरून बिल दुरुस्ती करण्यात आले.चालू बिल बंद कसे दाखवण्यात आले.याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. या संबंधी एजन्सी ला 300 रुपये दंड देण्यात आला आहे.ग्राहकांनि दुरुस्ती बिल वेळेत भरावे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.
सुधीर वानखडे उपकार्यकरी अभियंता चांदुर बाजार महावितरण

बॉक्समध्ये
कार्तिक कॉम्प्युटर एजन्सी या मिटर वाचन चा कॉन्ट्रॅक्ट घेतला असून मागील दोन वर्षात अनेक वेळा अश्या प्रकारच्या चुका करणयात आला.मात्र त्यावर दंड फक्त आजपर्यंत नावालाच देण्यात आला आहे.मात्र एजन्सी ला ब्लॉक लिस्ट मध्ये का टाकण्यात आले नाही हा प्रश्न उभा आहे

फोटो :-
61180 रुपये बिल देयक आणि दुरुस्ती केलेले बिल