परळी राष्ट्रवादीला सोडल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सुर

0
1305
Google search engine
Google search engine

किमान प्रा.टी.पी.मुंडे यांच्या संघर्षाचा तरी विचार करण्याची गरज होती

परळी (प्रतिनिधी):आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा पारंपारीक परळी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडल्याने कॉंगे्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून तिव्र नाराजीचा सुर दिसून येत आहे. या मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या, शेतकरी शेतमजुराच्या, अल्पसंख्यांकाच्या, अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी व हितासाठी गेल्या 40 वर्षापासून संघर्ष करणारे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या कार्याचा तरी विचार करण्याची गरज होती. अशी संतप्त प्रतिक्रिया मतदार संघाच्या प्रत्येक गावातील व शहराच्या वार्डा वार्डातील कॉंग्रेसजन व्यक्त करत आहेत.
बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघापैकी केवळ परळी हाच एकमेव मतदार संघ सन 2009 पासून कॉंग्रेस पक्षाकडे आहे. परळी मतदार संघात गेल्या 40 वर्षापासून प्रा.टी.पी. मुंडे सर हे जनकल्याणासाठी व लोकहितासाठी संघर्ष करत आहेत. जिथे अन्याय तिथे प्रतिकार करण्यासाठी प्रा.टी.पी.मुंडे सर असे समिकरणच या मतदार संघात झालेले आहे. लोकहितासाठी रस्त्यावर येवून संघर्ष करणाऱ्या प्रा.टी.पी.मुंडे यांच्या या कार्याचा विचार करूनच मतदार संघातल्या गावागावात व परळी शहराच्या वार्डा वार्डात त्यांनी कॉंग्रेसला माननाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे व समर्थकांचे मोठी फळी निर्माण केली आहे. राजकारणा शिवाय व्यापारी शासकिय कर्मचारी आदि वर्गातही त्यांची चांगली इमेज आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या तडजोडीत हा मतदार संघ परंपरे प्रमाणे कॉंग्रेस पक्षाकडे राहील व जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झगडणाऱ्या प्रा.टी.पी.मुंडे सर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा हजारो कार्यकर्त्यांची व त्यांना मानणाऱ्या नागरिकांची होती. परंतू राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदार संघ स्वत:कडे घेवून प्रा.टी.पी.मुंडे यांच्यासह कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे मतदार संघात मोठा नाराजीचा सुर दिसून येत आहे.
दरम्यान परळी मतदार संघात जिथे सामान्य जनतेवर अन्याय तिथे प्रा.टी.पी.मुंडे सर हे समिकरण सर्वश्रृत असल्याने कॉंग्रेसजनांच्या या नाराजीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वास्तविक पाहता हा मतदार संघ कॉंग्रेस पक्षाकडेच रहावा व प्रा.टी.पी.मुंडे सर यांनाच येथून उमेदवारी द्यावी अशी प्रामाणिक इच्छा परळी शहर व मतदार संघातील हजारो कार्यकर्ते, मतदार व्यक्त करीत आहेत.
परळी मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे वृत्त समजताच मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची व मतदारांची घालमेल सुरू झाली. निराश झालेल्या हजारो कार्यकर्ते व समर्थकांनी प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या संपर्क कार्यालयात धाव घेवून आपल्यावर घोर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. याची आठवण करून देतांना कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, जेष्ठ नेते प्रा.नरहरी काकडे, ओमप्रकाश सारडा, जिल्हा उपाध्यक्ष प्रभुअप्पा तोंडारे, मागासवर्गीय सेलचे डॉ. माणिक कांबळे, ऍड. संजय जगतकर, कॉंग्रेस सेवादालाचे रावसाहेब देशमुख, यशवंत सोनवणे, छत्रपती कावळे, माजी नगरसेवक विश्वनाथ देवकर, शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे, नवनाथ क्षिरसागर, शाम गडेकर, महिला कॉंग्रेसच्या विजयमाला घाडगे, नुरबानो खाला, युवक कॉंग्रेसचे जम्मु भाई, राहूल कांदे, किशोर जाधव यांनी परळीचा कॉंग्रेसच्या हक्काचा मतदार संघ राष्ट्रवादीने हिरावून घेतल्याची व कॉंग्रेसजनावर अन्याय केल्याची खंत व्यक्त केली.