चांदूर बाजार येथे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतारदिन महोत्सवाचे आयोजन

0
810
Google search engine
Google search engine

चांदूर बाजार येथे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतारदिन महोत्सवाचे आयोजन
चांदूर बाजार/
शहरात २१ व २२ संप्टेंबरला जिल्हास्तरीय, सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी अवतारदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसिय सोहळा माधान रोड वरील, रघुवंशी मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.या महोत्सवाचे आयोजन अखिल भारतीय महानुभाव परिषद संचालीत,अमरावती जिल्हा महानुभाव परिषद अंतर्गत, चांदूर बाजार तालुका महानुभाव समितीद्वारे करण्यात आले आहे. जिल्ह्यात मागिल दहा वर्षीपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत. या आयोजनाचा मान दरवर्षी एका तालुका दिला जातो. या वर्षी हे दायीत्व चांदूर बाजार तालुक्यावर सोपविण्यात आले आहे. या सोहळा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी, तालुक्यातील सर्वच महानुभाव पंथीय जय्यत तयारीला लागले आहे. या महोत्सवात महानुभाव संत गोविंदप्रभू व संप्रदायाचे आद्यप्रवर्त चक्रधर स्वामी यांचे तत्वज्ञान. तसेच महानुभाव पंथाचे समग्र अध्यात्मिक ज्ञान, पंथातील जेष्ठ, श्रेष्ठ,आचार्यगण, महंत, साहित्यिक, सामाजिक, व्यक्तीकडून बहुमोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दोन दिवसिय महोत्सवात सकाळी पथाचे रात्री नऊ पर्यत, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने नामस्मरण, गीतापाठ,ध्वजारोहण, धर्मसभा, वक्त्यांचे विचार, उपहार आरती, देवपूजा प्रसाद वंदन,आरती, संगितमय प्रवचन सोबतच, दिनांक २१ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता, भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक २१ ला, गोपीराजबाबा शास्त्री, दर्यापूरकरबाबा, डॉ.सोनपेठकर, डॉ. मनोज तायडे, डॉ. संतोष ठाकरे इत्यादी मार्गदर्शन करणार आहेत. तर दिनांक २२ सप्टेंबर ला, बिडकर बाबा, कारंजेकरबाबा ,संजय दर्यापूरकर,जयरामबाबा तळेगांवकर, संदीप तडस, विश्‍वनाथ बाबा कारंजेकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. महानुभाव संप्रदायातील तरुण आज,पंथीय तत्वज्ञान व पंथीय आचरणापासून दुरावत आहे.त्याअनुषंगाने महानुभाव पंथातील तरुणांना या महोत्सवातून, पंथाचे समग्र तत्त्वज्ञान व धर्माचरणाबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून पंथीय तरूण महानुभाव सांप्रदायासी, मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी विषेश भर देण्यात येणार आहे. तसेच महनुभाव पंथाचे तत्वज्ञान व धर्माचरण पंथीय लोकांन सोबत,समाजातील ईतर सर्वच धर्मिय बांधवांना कळावे. हा या महोत्सवाचा मूख्य उद्देश आहे. असे महोत्सव आयोजन समितीकडून कळविण्यात आले आहे. तसेच महोत्सवात सहभागी होणार्‍यांसाठी, भोजन व आरोग्य याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या महोत्सवात यक्षदेवबाबा, पैठणकरबाबा, श्रीपाचराउतबाबा, वायंदेशकरबाबा सर्व रिध्दपूर, पुजदेकरबाबा, मुरलीधर मानेकर ईत्यादी र्शध्येय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या आनंदोत्सव पर्वणीचा लाभ जिल्हाभरातील, महानुभाव परिवारा सोबतच इतरही समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन घ्यावा. असे आवाहन महोत्सव समितिचे अध्यक्ष डॉ. विनोद कोरडे यांनी केले आहे.