पांगरी येथे बैलगाडीला ट्रकची जोराची धडक

0
593
Google search engine
Google search engine

 एक ठार एक गंभीर जखमी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दिनांक २२ – परळी बीड मार्गावर पांगरी येथे शेतातून घरी जात असताना बैलगाडीला भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिल्याने बैलगाडीत बसलेले दोन युवक खाली पडून यातील एक युवक ट्रकच्या टायर खाली आल्याने जागीच ठार झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यास परळी येथील खाजगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले आहे.

याविषयी सविस्तर असे की,पांगरी येथील दोन युवक काल रविवार दि. 22 रोजी शेतातून बैलगाडी घेऊन पांगरी गावाकडे, आपल्या घराकडे येत असतांना सिरसाळा ते परळी कडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रक क्र.एम.एच.२२ एन.२५९१ने  बैलगाडीस जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेने बैलगाडीतील दोन युवक अमोल किंचक खेत्रे वय २३ वर्ष व एक तिडके नावाचा २१ वर्षीय युवक दोघेही बैलगाडीच्या खाली जोराने आपटले. यातील अमोल खेत्रे हा खाली पडून ट्रकच्या टायर खाली आल्याने जागीच ठार झाला असून तिडके नामक तरुणास गंभीर जखमी अवस्थेत  परळी येथील खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत अमोल किंचक खेत्रे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यास दोन बहीण, व आई-वडील असा परिवार असून परिवारातील एकुलता एक कमावता तरुण गेल्याने खेत्रे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.या घटनेने  पांगरी गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सदरील मयतावर आज सोमवार रोजी सकाळी ११वा.च्या दरम्यान पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाव परिसरातील नागरिक महिला नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने अनेकांचे मन हेलावून गेले आहे.या घटनेचा तपास परळी ग्रा.पो.स्टे.चे पि.एस.आय.मनोज जिरगे हे करत करत असून ट्रक ड्रायव्हर संभाजी शिंदे रा.कौडगाव ता.गंगाखेड यास अटक करण्यात आली आहे.  वास्तविक परळी ते अंबाजोगाई रस्ता काम गत अडीच वर्षांपासून सुरु असल्याने परळी, सिरसाळा, तेलगाव, बिड या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने अपघातांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.