दत्तापुर येथे अज्ञात डस्टर गाडीने 6 वर्षाचा चिमुकलीला उडविले – उपचारादरम्यान मृत्यू

0
756

आपल्या घरासमोर चिमुकली मुलगी खेळत असताना तिला बोलवण्यासाठी तिची आई बाहेर आली असता भरधाव वेगाने येणाऱ्या डस्टर गाडीने मायलेकीला उडविल्याने यात 6 वर्षाची मुलगी उपचारादरम्यान मरण पावली तर आई गंभीर जखमी झाले ही घटना आज सोमवारी सायंकाळी सात वाजता शहरातील दत्तापूर भागात यवतमाळ रोडवर घडली
सिद्धी पंकज पतालिया असे मृतक चिमुकलीचे नाव असून जखमी आईचे नाव राणी पतालीया आहे