कसे भरतात रस्त्यातील खड्डे….?

0
684
Google search engine
Google search engine

शेगांव:- (जळगाव जामोद)
भारतीय संविधानानुसार भारतात प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि संविधानाच्या कलमंप्रमाने राज्यांमध्ये ज्यापक्ष्याचे उमेदवार संख्येने अर्थातच बहुमताच्या संख्येने निवडून येतात त्या पक्षातील निवडून आलेल्या उमेदवारांपैकी मुख्यमंत्री, मंत्री होतात तेव्हा शपथ घेतात “की ज्या खात्याची जबाबदारी आम्हाला दिली जाईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण निष्ठेने व इमानदारी ने पूर्ण करू” परंतु असे होताना दिसते का ? तो एक प्रश्नच आहे.
हल्ली काही दिवसा पासून रस्त्यातील खड्यांनी संपूर्ण राज्यात हाहाकार केला आहे .
त्यामध्ये मध्ये आमचा मतदार संघा कसा मागे राहतील. जळगांव जामोद मतदार संघ मध्ये रस्त्यावर अगडे वेगळे खड्डे दिसून येतात बाकी सर्व राज्यातील रस्त्यांमध्ये चंद्र अथवा तारा दिसले परंतु आमच्या संपूर्ण मतदार संघातील रस्तांच्या खाद्याचे आकार सर्व ग्रहांची प्रती कृती दिसते ते विशेष…
ज्याला निवडून राज्यावर ‘राज’ करण्यासाठी पाठवले त्याच जनतेचे आता काही घेणे – देणे आहे की नाही ? कारण शहराला जोडणारे जे लहान मोठे रस्ते आहे त्यामध्ये असंख्य असे लहान मोठे खड्डे पडलीली आहेत आणि यांचा सर्वात जास्त त्रास जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी व शेतमजूर वर्गाला होतो आहे, त्यांना कामाच्या ठिकाणी मोठी कसरत करत जावे लागते तसेच त्याचं रस्त्या लागत लहान मोठी शाळा, महाविद्यालये आहेत की जेथे असंख्य असे विद्यार्थी शिकतात, आजूबाजूच्या खेड्यातून बसणे प्रवास करतांना तसेच आपली उपजीविका भागविण्यासाठी मूल सेल्स मन चे काम करतात तर त्यांना सायकल, मोटसायकल वर नेहमी फिरावं लागतं परंतु रस्ता येवढं खराब झाला आहे की रत्यांने जातांना नवग्रहांचे दर्शन प्रत्येकजण घेऊनच जातो…
आता पाऊसाचे दिवस आहे त्यामुळे खाद्यामध्ये मध्ये पाणी भरते व अंदाज न आल्याने आपघात होतात याला दोषी कोण ? खाद्यांमध्ये पाणी साचून राहते त्यामुळे रोगराई पसरते याला उत्तर काय ? आता तर आपल्या मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुठे हे आता मंत्री पदी विराजमान झाले आहेत त्यानिमित्ताने आता तरी समस्या सुटतील असे चित्र होते पण आभास तो आभासचं पदरी पडली निराशाच परंतु काय फायदा ज्या जनते मूळे आपण या पदावर गेलो आपण त्यांना विसरलात असे दिसत आहे.
आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आता मुख्यमंत्री मंत्री ज्या गावातून रस्त्यावरून जातील तीच खड्डे भुझविले जातील दुसरी नाही असे सर्वत्र चित्र आहे वारे नेते…!
नेते येती गावोगावी
रस्ते भुजती आपोआपी
अन् जनता पडती खद्यांन मधी
ती आम्हाला कुठी दिसती??
शेतकरी ज्या प्रमाणे पाऊसाची प्रतीक्षा करत आकशा कडे पाहतो त्याच प्रमाणे गावा गवतील लोक नेते मंडळींची वाट बघतात की आले म्हणजे रस्त्या वरची खड्डे भुजतील !
आला निवडणुकीचा महिना !!
खड्डे बुजविण्याचा भेटे बहाणा ??
पाहू आता जनता कुणाला कौल देते...