आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीवर सर्वंकष परिणाम होऊन फलस्वरूप जगात सकारात्मक पालट होतो !

0
609
Google search engine
Google search engine
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन भारतीय ज्ञान जगासाठी मार्गदर्शक का आहे ?’ या विषयावर शोधनिबंध चेन्नई येथील राष्ट्रीय परिषदेत सादर !
       आधुनिक जगताने भौतिकदृष्ट्या पुष्कळ प्रगती केली असली, तरी मानवाच्या जीवनाची प्रत सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, हे जगभरातील वाढती उदासीनता, ताण आणि चिंता यांवरून लक्षात येते. जगाने सनातन धर्मातील काळाच्या परीक्षेत उतरलेल्या तत्त्वांचा आणि परंपरांचा अंगिकार केल्यास, जगातील सकारात्मकतेमध्ये वृद्धी होईल. या सकारात्मकतेमधील वृद्धीचा व्यक्तीची वृत्ती, वर्तन आणि कृती यांवर सर्वंकष सकारात्मक परिणाम होतो. फलस्वरूप जगात सकारात्मक पालट होतो, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले. त्या 21 सप्टेंबर 2019 या दिवशी चेन्नई येथे आयोजित ‘युवकांसाठी हिंदु धर्म’ या राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘श्री रामकृष्ण मठ’, चेन्नई यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क आणि सौ. क्षिप्रा जुवेकर याचे सहलेखक आहेत.
       विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा 55 वा शोधनिबंध होता. आतापर्यंत 13 राष्ट्रीय आणि 41 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करण्यात आलेल्या 3 शोधनिबंधांना त्या परिषदांमधील सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त झाला आहे.
      सौ. जुवेकर पुढे म्हणाल्या की, नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या कृतींमध्ये सहभागी झाल्यास व्यक्तीमध्ये नकारात्मकता वाढते. व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने तिच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या प्रदूषित होते. आपण क्षणोक्षणी आहार, पोशाख, संगीत आणि संगत यांसारख्या दैनंदिन जीवनातील घटकांच्या संदर्भातील निर्णय घेत असतांना उपरोल्लेखित मूलभूत सूत्रांची आपल्याला जाणीव नसते.
        त्यानंतर सौ. जुवेकर यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ वापरून करण्यात आलेल्या विपुल संशोधनातील 2 प्रयोगांबद्दल माहिती दिली. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण भूतपूर्व अणु शास्त्रज्ञ डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केले आहे. भारतीय परंपरा अधिक सकारात्मकता निर्माण करतात, असे या माध्यमातून केलेल्या 25 पेक्षा अधिक प्रयोगांतून दिसून आले आहे. याचे कारण ‘व्यक्ती आणि वातावरण यांवर सकारात्मक परिणाम व्हावा, अशा पद्धतीने भारतीय परंपरांची रचना करण्यात आली आहे’, हे आहे. बहुतांश वेळा आधुनिक जगतातील पद्धती नकारात्मकता निर्माण करणार्‍या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
       शेवटी सौ. जुवेकर यांनी जगतातील वाढती नकारात्मकता रोखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे सार पुढील शब्दांत मांडले :
१. आध्यात्मिक स्पंदने आणि त्यांचा स्वतःच्या जीवनावरील परिणाम याबद्दल स्वतःचे प्रबोधन करणे.
२. नित्यनेमाने साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होते आणि फलस्वरूप ती आपोआप अधिकाधिक सात्त्विक पर्याय निवडते अन् तिची आध्यात्मिक उन्नती होते.