त्या विवाहितेच्या खुन प्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल >< गळा आवळून मारल्याचा नातेवाईकांचा आरोप

0
986
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे:

तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील विवाहितेने १४ सप्टेंबरला राहत्या घरी आत्महत्या केली होती.या प्रकरणी विवाहितेच्या नातेवाईकांनी हत्या झाल्याचा आरोप केल्यानंतर कु-हा पोलीसांनी मृत महिलेच्या पतीसह सात जनांविरूध्द शनिवारी(ता.२१)खुनाचा गुन्हा दाखल केला.
दुर्गा नितीन डोंगरे(वय२२) असे मृत महिलेचे नाव आहे.मृत महिलेची आई सविता लक्ष्मण पुंडे(वय ४३)रा.वेणी बुदू्रक,जि.यवतमाळ यांच्या तक्रारीवरून कु-हा पोलीसांनी दुर्गाचा पती नितीन दादाराव डोंगरे, नीलेश डोंगरे, जया डोंगरे, अमोल डोंगरे (सर्व रा.आमला विश्वेश्वर)कमलाबाई राजूरकर,मुरलीधर राजूरकर(रा.गोंधनी जि.नागपूर) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले.१४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.शव विच्छेदन अहवालात गळा आवळून मृत्यूचा उल्लेख असल्याचे पोलिस निरीक्षक एस.के.जाधव यांनी सांगीतले.घटनेच्या दिवशी दुर्गा नितीन डोंगरे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी कु-हा पोलीसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.शव विच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपात दुर्गा हिचा खुन करून पुरावा नष्ट करण्याचा सासरच्यांनी प्रयत्न केला असे म्हटले.या प्रकरणी कुणाला अटक झाली नसल्याचे अधिका-यांनी सांगीतले सांगीतले. दुर्गा यांना मानसिक आजार असल्याचे नातेवाईकांनी सांगीतले. त्या दिशेने अधिकचा तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक एस.के.जाधव यांनी सांगीतले.