आकोटात माईंड पॉवर विषयावर व्याख्यान संपन्न

0
715
Google search engine
Google search engine

आकोटात माईंड पॉवर विषयावर व्याख्यान संपन्नL.

आकोटः ता.प्रतिनीधी स्थानिक अकोट येथे फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस यांच्यावतीने प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी माईंड पॉवर कशी वाढवायची? या विषयावर दोन तासाच्या व्याख्यानाचे आयोजन 22 सप्टेंबर 2019 ला रविवारी सकाळी 11 वाजता केले होते.

आपण आपल्या मनाला शिस्त लावून, दररोज नियमित प्राणायाम करून ,उपवास करून, कमी बोलून ,एकांतात स्वतःला वेळ देऊन ,मंद आणि शांत संगीत ऐकून, तसेच अल्फा स्वरुपाची मनस्थिती प्राप्त करून आपण आपल्या माईंची पॉवर वाढवू शकतो असे आपल्या व्याख्यानातून प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांनी विचार मांडले .
त्याआधी बोलताना प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी आपल्या व्याख्यानातून कॉन्शियस माईंड आणि सब कॉन्शियस माईंड यांची वेगवेगळ्या स्वरूपाची कार्य सांगितली. आणि सोबतच जीवन म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर या तिघांचे एकत्रीकरण होय ,असे सुद्धा त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून माननीय प्रा. श्री नंदकिशोर झामरे सर, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रा. श्री अक्षय काळे सर आणि माननीय श्री शेखर बोंद्रे सर, प्रमुख वक्ते प्रा. प्रवीण बोंद्रे सर, प्रमुख उपस्थिती मध्ये एडवोकेट संतोष खवले सर, डान्स कोरिओग्राफर माननीय श्री रितिक राणे सर, ताई नीता बोंद्रे मॅडम यांची उपस्थिती होती ,तसेच माझे मित्र श्री शिवम दुबे यांची सुद्धा उपस्थिती होती.
तसेच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया स्थित किलिमांजारो आणि रशियातील एलब्रूस शिखर सर करणारा आणि ज्यांचे इंडियन ग्रीनिष बुक रेकॉर्ड मध्ये नाव आहे असे आमचे लाडके मित्र श्री धीरज कळसाईत यांची विशेष उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अजय रायबोले यांनी यशस्वी प्रयत्न केले .