रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव दि.२ आँक्टोबरला.

0
561
Google search engine
Google search engine

आकोट.: ता.प्रतिनिधी-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आकोट शाखेचा विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव मंगळवार दि.०२/१०/२०१९रोजी साजरा होणार आहे.नगराचा हा उत्सव श्री.सरस्वती विद्यालय पटांगण, काँलेज रोड येथे सांयकाळी ६.१५ला आयोजित करण्यात आला आहे.

या  कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता मा.श्री.शैलेशजी जोशी (प्रांत संघटन मंत्री, विद्याभारती ,विदर्भ आणि देवगिरी प्रांत) , तर प्रमुख अतिथी श्री. दिनेश ल. भुतडा यांच्या उपस्थिती लाभणार आहे.

त्यापुर्वी दुपारी ४.४५वा.संघाचे सघोष सदंड पथ संचालन श्री सरस्वती विद्यालयातून निघुन प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे.तसेच पाऊस आल्यास उत्सव श्री.नरसिंग महाराज सभागृहात पार पडणार आहे. या उत्सवास सर्व नागरिकांनी सहपरिवार वेळेपुर्वी उपस्थितीत राहावे असे आवाहन नगर कार्यवाह नितीन शगोकार यांनी केले आहे.