पवार साहेबांचा सरकारच्या हुकूमशाही विरोधातील लढा  एकट्याचा नाही तर जनतेचा- धनंजय मुंडे

0
389
Google search engine
Google search engine
अमोल सूर्यवंशी….
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची 55 वर्षांची स्वच्छ राजकीय कारकिर्द राज्यातील 12 कोटी जनतेच्या समोर आहे. असे असताना एम.एस.सी. बँके प्रकरणी काहीही संबंध नसताना फक्त निवडणूका ध्यानात ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पूर्ण महाराष्ट्रात मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपा सरकारने त्यांच्यावर ई.डी. ची कारवाई करण्याचा प्रकार केला आहे. त्या विरूध्द पवार साहेब देत असलेला सरकारच्या हुकूमशाही विरूध्दचा लढा हा केवळ त्यांच्या एकट्याचा नाही तर जनतेचा लढा आहे, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
श्री.शरद पवार हे आज स्वतः हा ई.डी. कार्यालयासमोर चौकशीसाठी जाणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या सोबत निघालेल्या मुंडेंनी त्या आधी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना या देशात लोकशाही राहिली आहे की नाही, भारतीय जनता पार्टीला सत्तेची मस्ती चढली आहे, आणि हे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याचे म्हंटले आहे.
कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी आमची नसून पोलीसांची व ई.डी. ची सुध्दा आहे. आम्ही गांधी मार्गाने या कृतीचा निषेध करत आहोत. येणार्‍या पिढीच्या भविष्यासाठी लढतो आहेत, जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूकांना सामोरे जात आहोत. तेंव्हा ई.डी. ने विनाकारण कारवाई केलीच का ? हा जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लोकशाहीला आणि घटनेला धक्का लागेल अशी कोणतीही वर्तणुक करत नाही, करणारही नाही मात्र कार्यकर्त्यांची धरपकड करत मुस्काटदाबी करण्याचा जर प्रयत्न केला जात असेल तर आम्ही सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.