अकोट रोटरीचे स्वास्थ्य कार्यशाळा व मोफत तपासणी शिबीर

0
596
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता प्रतीनिधी:-

जागतीक उच्च् रक्तदाब दिनानिमित्तय् अकोट शहरात रोटरी इंडियाच्या मधुमेह, उच्च् रक्तदाब व लठठपणा निर्मुलन जनजागरण प्रकल्प् अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रोटरी क्ल्ब ऑफ अकोट व द स्कुल अकोट च्या सयुंक्त् विदयमाने दि. 28 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी .2.30 ते 4 वाजे पर्यंत विदयांचल द स्कूल , अकोट येथे हे एक दिवसीय शिबीर राबवण्यात येणार आहे. या शिबीरात चिराणीया हॉस्पीटल चे डॉ. जुगल चिराणीया हे आपल्याला स्वास्थ् कार्यशाळे अंतर्गत त्यांच्या व्याख्याना मध्ये जेवणा मध्ये तेलाचे प्रमाण किती असायला पाहीजे? व कोणते तेल शरीरा साठी चांगले आहे? प्रोटीनचे महत्व् काय? शरीरामध्ये साखर किती फायदेशिर व नुकासानदायक आहे? पोट भरेल पण वजन वाढणार नाही तेव्हा आपण कुठला आहार घ्यायला पाहीजे? कोणत्या प्रकारचे व्यायाम चांगले आहे? व किती वेळा पर्यंत व्यायाम करावे? सर्व रोगांची एकच दवा कोणती आहे? त्या बदद्ल सविस्तर् माहीती हया कार्यशाळे मध्ये देण्यात येणार आहे. या सोबतच आरोग्याची तपासणी डॉ. विशाल इंगोले यांच्या मार्गदर्शनात बि.पि.,शुगर , व इसिजी चि तपासणी मोफत करुण मिळणार आहे. तरी सर्व जागरुक नागरिकांनी हया शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती रोटरी क्ल्बचे अध्यक्ष नंदकिशोरजी शेगोकार ,आयपिपि अरविंद गणोरकार ,सचिव शिरीष पोटे व रोटरीचे सर्व माजी अध्यक्ष करतात असे रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.