शेगांव नगर परिषद कडून स्वच्छतेचे ३ तेरा…..!

0
1158

शेगांवमधील नागरिकांमध्ये विधानसभा मतदानावर बहिष्काराची चर्चा ? कश्यासाठी ?

शेगांव :- देशाच्या राजधानीतून भव्यदिव्य अश्या लालकिल्ल्याच्या प्राचीवरून २०१४ ला भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी २०१९ ला होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी सांगितलेल्या स्वच्छतेच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या भारत देशाला स्वच्छ करण्याचा निर्धार घेतला फक्त निर्धारचं नव्हे तर स्वतः पुढे येऊन स्वच्छतेसाठी माहिती, भाषणे नव्हे तर खुद्द हातात झाडू घेऊन साफ-सफाई करीत जनतेला स्वच्छतेचे आव्हाहन केले. भारतानेच नव्हे तर जगभरात या स्तुत्य कार्याचा ठसा दिसला. या वैश्विक कार्यासाठी अवघी सरकारी यंत्रणा सज्ज झाली त्यासाठी निधीची तरतूद सुध्दा केली आणि या कार्याला जनतेकडून भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळाला तसेच आपला देश,शहर, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवने किती गजेचे आहे ही बाब जनतेच्या लक्षात आली व जणूकाही स्वच्छते विषयी ऐक क्रांति घडून आली परंतु हे सर्व कार्य जनतेसाठी केले गेले. हे कार्य भारताचे पंतप्रधान यांनी सुरुवात केली परंतु ते ज्या पक्ष्याचे आहेत त्या पक्षाच्या स्थानिक पातळीच्या नेत्यांकडून आपल्या पंतप्रधानचे अनुकरण होतांना दिसत नाही त्यांचे निवडून आलेले उमेदवार तथा जनप्रतीनिधी मात्र हे विसरले…?

मागील काही महिन्यांपासून शेगांव शहरात घाणीने हाहाकार माजविला आहे, याकडे शेगांव नगरपरिषद मध्ये सत्तेत असलेली सेना – भाजपा सरकार चे दुर्लक्ष आहे असे स्पष्ट दिसत आहे.

जनतेने मोठ्या विश्वासाने लोक प्रतिनिधीला निवडून दिले परंतु समस्या निरकरणासाठी कोणी दिसत का नाही ? ते दिलेली वचन विसरून का जातात ? तसेच नगर परिषदच्या प्रत्येक विभागासाठी एक – एक सभापतीची निवड केली जाते, शेगांव नगर परिषद मध्ये आरोग्य सभपती महोदय ह्या पदावर महिला सभापती आहेत हा पदभार स्विकारला जातो तेव्हा त्यांनी “मी निष्ठेने काम करील” अशी शपथ घेतली की नाही हा प्रश्नच आहे….असो

अशीच परिस्थिती प्रभाग क्र.०८ मध्ये उद्भवली आहे. मागील काही दिवसा पासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेगांव शहारामध्ये पावसाच्या खऱ्याखुऱ्या पाण्याच्या लाटेमुळे नियोजनाचा भोंगळकारभार समोर उजेडात आला आहे, त्याचे परिणाम असे की लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. प्रभाग क्रमांक ०८ जानोरी रोडवर नालीमधील घान साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी लोकाच्या घरा समोर साचत आहे. त्यामूळे तेथील परिसरात घाण वास, डास तसेच जिवघेनी बॅक्टरिया त्या पाण्यात आढळून आले यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये रोगराई पसरल्यास किंव्हा जिवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनता विचारत आहे. तेथील नागरिकांनी वारंवार लेखी तक्रार दिली, लोकप्रतिनिधींनाही भेटले त्यांनी त्याची पाहणी करून महिना झाला, “आज करतो; उद्या करतो” अश्या प्रकारचे पोकळ आश्वासन आणि फक्त भुल थपचं मिळत आहे. विशेष बाब म्हणजे तो परिसर दूर असल्यामुळे घंटागाडी सुद्धा येण्यास टाळा टाळ करते, हेचं का ते स्वच्छ भारताचे नियोजन ! आणि त्यामुळे तेथील रहिवाशांना पर्याय नसल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे. मजेशीर गोष्ट अशी की हा प्रभाग सत्तेत असलेले शिवसेना व भाजप चा आहे आता त्रस्त झालेल्या जनतेने “आमची समस्या दूर न झाल्यास येणाऱ्या विधान सभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे”.