परतवाड्यात श्यामा पहेलवान याचा भरदिवसा खून, आरोपी फरार

0
6428

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात भर दिवसा हत्या झाल्याची बातमी हाती आली असून यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहीती मिळते, शहरातील काही भागातील दुकाने बंद करण्यात आले असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे, ऑटो समवेत काही शाळा कॉलेज ला ही बंद करण्यात आल्याची माहिती ही समोर आली

परतवाडा शहरातील टिंबर डेपो रस्त्यावरील महावीर चौक वर कोपेरेटीव्ह बँक समोर हल्ला झाल्याची माहिती मिळत असून मृतक श्यामा पहेलवान वर धार धार शस्त्राने हल्ला केल्याने श्यामा यांच्या मृत्यू झाला, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरिक देवाण घेवाण च्या कारणावरून हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे,