चांदूर रेल्वेत काँग्रेसच्या नामनिर्देशन रॅलीतुन राष्ट्रवादीचे नेते गायब- मित्र पक्षांत नाराजीचा सुर

0
1685
Google search engine
Google search engine

अमरावती – (विशेष प्रतिनीधी)

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन सर्वच पक्षांच्या उमेदवारंचे नामनिर्देशनपत्र उचलुन भरण्यास सुरूवात झाली आहे. परंतु आता काँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांमध्ये घुसफुस सुरू झाली आहे. चांदूर रेल्वेत आज सोमवारी आयोजित नामनिर्देशन भरण्याच्या रॅलीमध्ये व नामांकन दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे मित्र पक्षांत नाराजीचा सुर असल्याचे समोर आले आहे.

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाची आघाडीतर्फे तिकिट काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी चांदूर रेल्वे शहरातुन रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. परंतु आ. जगताप हे आघाडीचे नसुन केवळ काँग्रेस पक्षाचेच उमेदवार असल्याचे चित्र दिसले. कारण त्यांच्या रॅलीत किंवा नामांकन दाखल करतेवेळी कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आढळून आला नाही. अशा प्रकारामुळे काँग्रेस उमेदवारावर राष्ट्रवादी पक्षाचा नाराजीचा सुर असल्यामुळे आ. जगतापांना ही निवडणुक कठीण जाण्याची शक्यता असुन याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रॅलीमध्ये मात्र नेते नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आढळून आले.

काँग्रेसकडून आम्हाला विचारपुस नाही – जावेदभाई

आ. वीरेंद्र जगताप आघाडीचे उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडून आम्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारपुस करणे गरजेचे होते. तसेच फोनवरून किंवा कोणामार्फत निमंत्रय द्यायला पाहिजे होते परंतु असे काहीही न झाल्यामुळे आम्ही नामांकन दाखल करतेवेळी हजर झालो नाही तसेच प्रचारासंबंधी भुमिका वरिष्ठांसोबत बैठक झाल्यानंतर घेणार असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेदभाई यांनी सांगितले.

 

निमंत्रण मिळालं नाही – विनय कडू

नामांकन दाखल करण्याच्यापुर्वी आम्हाला काँग्रेसकडून निमंत्रण मिळायला पाहिजे होता. परंतु काँग्रेसकडून कुठलेही निमंत्रण मिळाले नसल्यामुळे आम्ही सहभागी झालो नाही तसेच वरच्या स्तरावरून सद्यास युती असल्याचे जाहीर झाले नाही असे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा चांदूर रेल्वेतील नेते विनय कडू यांनी म्हटले.