ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांनी दिला धनंजय मुंडेंना आशीर्वाद – म्हणाले धनंजय तर परळीचे रत्न ते जपा

0
1009
बीड: परळी वैजनाथ , नितीन ढाकणे
धनंजय मुंडे हे परळीचे रत्न आहेत ते रत्न जपण्याची गरज असून, त्यांना आमचे आशीर्वाद तर आहेतच मात्र त्याबरोबरच केवळ आशीर्वाद देवून आम्ही थांबणार नाहीत, त्यांच्या या निवडणूकीच्या विजयाची जवाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेत आहोत अशा शब्दात परळी शहरातील सर्वपक्षीय ज्येष्ठ व जुन्या जाणत्या नागरिकांनी आज धनंजय मुंडेंना आशीर्वाद दिले.
जागतिक ज्येष्ठ दिनाचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी आज शहरातील ज्येष्ठ मंडळींशी मुक्त संवाद साधला. त्यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.सुरेश चौधरी, अ‍ॅड.अनिल मुंडे, नारायणदेव गोपनपाळे, प्रा.विजयप्रसाद अवस्थी, विलासराव ताटे, विश्वनाथ गायकवाड यांनी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाची परळी शहराला गरज आहे, त्यांनी शहराचे नाव उज्वल करण्याचे काम केले असून, वडीलकीच्या नात्याने त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. या पोराला आता खर्‍या अर्थाने परळीकरांनी ताकद देवून शहराचे नाव अधिक उंचावण्यासाठी बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते श्रीकांत मांडे यांच्या अंबेवेस भागातील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघाच्या विकासाचे आपले स्वप्न सांगतानाच आज ज्येष्ठांनी दिलेले आशीर्वाद पाहून स्व.अण्णांची आठवण झाली, त्यांची उणीव या मंडळींनी ताकद देवून काही प्रमाणात भरून काढण्याचे काम केले असून, त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम न करता परळीची मान उंचावेल असे काम करून दाखवण्याचे वचन दिले.
या बैठकीस रा.काँ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, काँग्रेसचे नेते प्रकाशराव देशमुख, गणपतराव कोेरे, बाबासाहेब देशमुख गुरूजी, जी.एस.सौंदळे, अनंतराव भातांगळे, अ‍ॅड.कडबाने, जाबेरखान पठाण, विजय भोयटे, शंकर आडेपवार, डॉ.टिंबे, अनिल अष्टेकर, बाबासाहेब देशमुख गुरूजी, राजनाळे सर, प्रभाकर देशमुख, दशरथ चाटे, खके सर, नरहरी टेकाळे अप्पा, विद्याताई नानवटे, वैजनाथराव बागवाले, चव्हाण साहेब, शरदराव कुलकर्णी, संजय देवकर, प्रताप देशमुख, राहूल देशमुख, जयराज देशमुख, संतोष सोळंके, विश्वनाथ हरंगुळे, अल्ताफभाई, एत्तेशाम खतीब, फरकुंद अली बेग, मेहबुब शेख, जलील पठाण आदींसह नागरिक उपस्थित होते.