रूपसिंग तांडा येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
503
Google search engine
Google search engine

बीड: परळी वैजनाथ

📝अमोल सूर्यवंशी

परळी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज तालुक्यातील रूपसिंग तांडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

जगमित्र संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, कृ. उ. बा. समितीचे संचालक माणिकभाऊ फड यांच्या उपस्थितीत प्रकाश भिमा पवार, अशोक प्रभु चव्हाण, भाऊराव पवार, जगन्नाथ पवार, लहू पवार, रूक्ष चव्हाण, अमोल पवार, सुभाष पवार, नामदेव चव्हाण, कृष्णा चव्हाण, मधूकर राठोड, धोंडीराम चव्हाण, रणजित राठोड, वसंत पवार, अमोल पवार, शंकर राठोड, मारोती चव्हाण, अरूण कोळंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार केला.