अमरावती शहरातील, Camp परिसरात, Thomas Church जवळ एका मादी बिबट आपल्या पिल्लासह निदर्शनास आली आहे. सदर परिसर दाट लोकवस्तीचा असून या भागात शाळादेखील आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. वन विभाग, पोलिस व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
*नागरिकांनी घ्यावयाची काळजी*
• सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा एकटे जाणे टाळावे.
• लहान मुलांना घराबाहेर एकटे खेळू देऊ नये.
• पाळीव जनावरे, विशेषतः कुत्री, बोकड व कोंबड्या, रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
• बिबट दिसल्यास त्याला त्रास देऊ नये, दगडफेक करू नये किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये.
• बिबट दिसून आल्यास त्वरित वन विभागाच्या हेल्पलाईनवर 1926 किंवा +91 77680 38884 किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे.
*शाळांसाठी सूचना*
• शाळेच्या आवारातील सर्व दरवाजे बंद ठेवावेत.
• विद्यार्थ्यांना गटानेच हलवावे व शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखालीच बाहेर ने-आण करावी.
• सक्तीचे कार्यक्रम (मैदानावरची सभा, खेळ) सध्या टाळावेत.
• पालकांना परिस्थितीबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना आणणे-नेणे यावेळी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करावे.
*महत्त्वाची विनंती*
• नागरिकांनी अफवा पसरवू नये व घाबरून जाऊ नये.
• वन विभागाची पथके घटनास्थळी कार्यरत असून सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
• सर्वांच्या सहकार्यामुळे ही परिस्थिती लवकर हाताळता येईल.
अमरावती वन विभाग






