आकोटात रोटरीच्या स्वास्थ कार्यशाळा व तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

0
615

आकोटात रोटरीच्या स्वास्थ कार्यशाळा व तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

आकोटः ता.प्रतिनिधी

स्थानिक विदयांचल द स्कुल मध्ये अकोट रोटरी क्लब ऑफ अकोट द्वारा जागतीक उच्च् रक्तदाब दिना निम्मीत्त्य् स्वास्थ् कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .हया शिबिरास अकोट शहरवासी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मंचावर अकाेट रोटरीचे अध्यक्ष नंदकिशाेर शेगाेकार रोटरी चॅरिटबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रभाकरराव मानकर ,दिनेश भुतडा,माजी अध्यक्ष अरविंद गणोरकर व प्रमुख वक्ते अकोल्याचे आहार तज्ञ तथा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जुगल चिराणीया उपस्थीत होते त्यांनी सुखी, आनंदी आरोग्य् जीवन जगण्यासाठी काही नियमांचे पालन करणे हे फार आवश्य्ाक अाहे. त्यामध्ये त्यांनी शरीरीक व्यायाम कोणते, हदय मजबुत करण्यासाठी कोणते, व्यायामाचे प्रकार तसेच सोबतच शरीरामध्ये दैनंदीन जीवनात तेलाचा वापर किती करावा कसा करावा, तेलाचे प्रकार ,आहारा मध्ये जवस व तीळ असने किती गरजेचे आहे,प्रोटीनचे शरीरामध्ये असलेले महत्व, शरीरामध्ये हार्मान्सचे निर्मीती आदीबाबत माहीती सांगीतली.. जर तुम्ही क्रोधामध्ये असलात तर तुमची प्रतीकार शक्ती 4-5 घंटे कमजोर होऊन जाते त्याउलट जर तुम्ही आनंदी राहले तर तुमची प्रतीकार शक्ती 24 तास चांगली राहते तेव्हा जीवनात नेहमी हसत राहा हसवत रहा. जीवनात एकटे राहने हे 15 सिगारेट पिनया ऐवढे दुषपरीणाम करते तेव्हा जास्तीत जास्त जास्त मित्र बनवा मित्रांसोबत राहा,अगर आपको रहना है हीट तो खुद को बनाओ HEALTHY & FIT.अशा अनेक प्रकारची सविस्तर माहिती डॉ.जुगल चिरानियां यांनी देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
हया शिबीरामध्ये उपस्थीतांची बीपी शुगर व इसीजी काढुन देण्यात आली.त्यानंतर तपासणी व आरोग्यविषयक सल्ला डॉ. विशाल इंगोले व डॉ.धम्मपाल चिंचोळकर यांनी दिला .त्यांना मोहन नेरकर, दिपक इंगळे व किरण गुहे, यांनी सहकार्य करत 255 जणांची तपासणी यशस्वी करण्यात आली.
यावेळी कीत्येक लोकांचे उच्च रक्तदाबाचे निदान करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये अकोट शहरातील प्रतिष्ठित नागरिक,
जेसीआयचे सदस्य्, उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विधांचल चे कर्मचारी वर्ग, रोटरी चारिटेबल ट्रस्टचे सचिव राजकुमार गांधी ,विजयजी झुनझुनवाला , उदधवराव गण्गणे, अनंतराव काळे, शेतकरी मोटर्स कर्मचारी आदींनी प्रयत्न केले अशी माहीती अकोट रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे कळवितात.