कवीवर्य नंदकिशोर हिंगणकरांचा मनमोहोर फुलला….आज काव्यसंग्रहाचे प्रकाशन ————————- आकोटःसंतोष विणके

0
529
Google search engine
Google search engine

कवीवर्य नंदकिशोर हिंगणकरांचा मनमोहोर फुलला….आज काव्यसंग्रहाचे प्रकाशन

————————-
आकोटःसंतोष विणके

विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे दिलखुलास व्यक्तीत्व कविवर्य नंदकिशोर हिंगणकर यांचे *”मनमोहोर”* काव्यसंग्रहाचे प्रकाशन २,आक्टोबरला स.१०वा श्रद्धासागर येथे संपन्न होत आहे.

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध व-हाडी साहित्यिका डाॕ.प्रतिमा इंगोले यांचे शुभहस्ते होत असून भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त बारोमास कादंबरीचे लेखक तथा प्रसिद्ध वक्ते डाॕ सदानंद देशमुख बुलढाणा ,मराठी वाङमयाचे गाढे अभ्यासक प्रा.ग.रा.अंबाडकर आकोट यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.याप्रसंगी सहकार नेते नानासाहेब हिंगणकर ,अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य अॕड.गजानन पुंडकर,मातोश्री सुमनताई हिंगणकर व रमाकांत पाटील धर्माळे उपस्थित राहणार आहेत.
————————-
शासनाचे शिक्षण विभागातून प्रशासन अधिकारी पदावरुन ३०सप्टेबरला सेवानिवृत्त झालेले नंदकिशोर हिंगणकर शैक्षणिक ,सामाजिक ,आध्यात्मिक ,सांस्कृतिक साहित्य ,पत्रकारिता व पर्यावरण आदी क्षेत्रात अग्रणी व्यक्तीमत्व आहेत.आपले कार्य व्यस्ततेतही त्यांनी आपल्यातील कवीमन जागविलेआणि फुलविले आहे.समाज जीवनात घडत असलेल्या विविध प्रसंगातील वेदना आणि संवेदना त्याच्या कवितातून उमटतात.त्त्या जनभावनांचे प्रतिनिधित्व करतात.यातील निवडक कविता “मनमोहोर” काव्य संग्रहात समाविष्ठ आहेत.
————————-
यथोचित कार्य गौरव….

मनमोहोर काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्या अंतर्गत नंदकिशोर हिंगणकर शिक्षण प्रशासन सेवेतून निवृत्त झाल्याद्दल त्याच्या कार्याचे सन्मानार्थ डाॕ सदानंद देशमुख यांचे हस्ते यथोचित कार्य गौरव करण्यात येत आहे.
वाशिम,मुर्तिजापूर,आकोट ,अंजनगांव येथील नगरपरिषदेत प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असतांना एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.सरकारी शाळेत शिकणा-या विशेषतः मागासवर्गिय व दुर्बल घटकातील लेकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी राबविलेले शैक्षणिक उपक्रम पथदर्शी ठरले आहेत हे विशेष.
त्यांचे मित्र परिवाराने प्रकाशन व गौरव समारंभ आयोजित केला आहे.याप्रसंगी काव्य रसिकांनी हजर रहावे असे आवाहन संंयोजकांनी केले आहे.
————————-