युवा महोत्सव – 2019 पहिल्या व दुसया दिवशी विविध कला प्रकारात कलावंत विद्याथ्र्यांचे दर्जेदार सादरीकरण परिसर कलावंतांनी गजबजला

0
668
Google search engine
Google search engine

युवा महोत्सव – 2019
पहिल्या व दुसया दिवशी विविध कला प्रकारात कलावंत विद्याथ्र्यांचे दर्जेदार सादरीकरण
परिसर कलावंतांनी गजबजला

अमरावती.
विद्यापीठाच्यावतीने शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था, अमरावती परिसरात सुरु असलेला युवा महोत्सव 2019 कार्यक्रमामध्ये पहिल्या व दुसया दिवशी सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांनी विविध कला प्रकारात दर्जेदार सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परिसर कलावंतांनी गजबजून गेला. प्रत्येक कलावंत आपल्या सादरीकरणाची तालीम करून उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रचंड मेहनत घेतांना दिसत होता.
पहिल्या व दुसया दिवशी गोंडी, गोंधळ, राजस्थानी, दिंडी, लावणी, गुजराती लोकनृत्य, भारतीय समुहगान, एकांकीका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज, पाश्चिमात्य वाद्यसंगीत, स्थळ छायाचित्रिकरण यासह शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, सुगम संगीत, स्पॉट पेंटींग व पोस्टर मेकिंग, पाश्चिमात्य गायन व पाश्चिमात्य समूहगान, क्विज लेखी परीक्षा आदी विविध कला व स्पर्धा प्रकारात कलावंत विद्याथ्र्यांचा सहभाग दर्जेदार राहील. डॉ. चंदु पाखरे, विद्या साळवे, अक्षरा नाईक (मुंबई) या परिक्षकांसह इतर परिक्षकांनी या स्पर्धांचे काटेकोरपणे परिक्षण केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रफुल गवई, विद्यार्थी विकास समितीचे सदस्य डॉ. राजीव बोरकर, डॉ. जयश्री वैष्णव, डॉ. रेखा मग्गीरवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावी रेड्डी, युवा महोत्सव 2019 चे समन्वयक डॉ. सुधीर मोहोड, सहसमन्वयक डॉ. विनोद गावंडे, महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यापीठ विकास विभागातील श्री संतोष वानखडे आदी परिश्रम घेत आहेत.
उद्याच्या स्पर्धा
दि. 02 ऑक्टोबर, 2019 रोजी स. 8.30 वाजतापासून लोकनृत्य, फोक ऑकेस्ट्रा, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कार्टुनिंग व क्ले-मॉडलिंग व क्विज अंतीम फेरी आदी स्पर्धा तर दि. 03 ऑक्टोबर, 2019 रोजी स. 8.30 वाजतापासून लोकनृत्य, स्किट व माईम, एकांकिका, मिमिक्री, सुगम संगीत, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य), शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य), मेहंदी, रांगोळी, स्थापना आदी स्पर्धा संपन्न होतील. त्यानंतर लगेचच सायं. 4.00 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथे समारोप समारंभ होईल.
——————————————————————————————-