*नेहरू युवा केंद्रा वाशिम अंतर्गत रिसोड ब्लॉक च्या वतीने 150 वी गांधी जयंती निमित्य स्वच्छता अभियान व रॅली*

0
847

रिसोड :- (रुपेश बाजड)

 

आज दि 2/10/2019 रोजी रिसोड तालुक्यातील मोप येथे नेहरू युवा केंद्र वाशीम अंतर्गत रिसोड ब्लॉक च्या वतीने युवका सोबत 150व्या गांधी जयंती निमित्त स्वच्छता रॅली व गावांमध्ये स्वच्छता करण्यात आली व लहान लहान मुलांनी गांधीजींची वेशभूषा करून नागरीकांना स्वच्छतेविषयी विषयी माहिती दिली आणि या स्वच्छतेमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच मोप येथून गावामधून स्वच्छता रॅली काढण्यात आली गावातील नागरिकांना स्वच्छता अभियाना विषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी उपसरपंच शैलेश नरवाडे,तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक व्ही. वाय, डहाळे, डी. पी,बोबडे उल्हास महाले,एस आर.अंभोरे हे उपस्थित होते.व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रिसोड ब्लॉक चे दिपाली बोबडे व स्वामी विवेकानंद युवा मंडळ चे अध्यक्ष रुपेश बाजड यांनी परिश्रम घेतले गावातील युवक व युवती या रॅलीमध्ये व स्वच्छता यामध्ये सहभाग घेतला……….।।।