अमरावती :-
भारतीय महाविद्यालय अमरावती येथे गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत दिवाळीनिमित्त दिव्यांची विक्री यांचे प्रदर्शनी स्वयंरोजगार कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य यांनी केले.
कार्यक्रमात गृहअर्थशास्त्र हा जीवनाशी सांगड घालणारा उपयोजनशील विषय असल्यामुळे, मानवाच्या गरजेची पूर्ती करण्याची क्षमता या विषयातआहे. स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून जीवनव्यापी आहे . म्हणूनच गृह अर्थशास्त्र विषयात शिकलेल्या विद्यार्थिनींना भावी जीवनात नोकरी न मिळाल्यास किंवा निराशाचे जीवन न जगता यावे, यासाठी शिक्षणाचा फायदा आपण स्वयंरोजगार तयार करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावू शकतो .या उद्देशाने स्वयंरोजगार प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटक वैद्य मॅडम यांनी प्रदर्शनी मध्ये ठेवलेल्या स्वहस्तेकलेंनी तयार केलेल्या दिव्यांची पाहणी करत असताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “केवळ पुस्तकी शिक्षण हे आदर्शाच्या प्राप्ती करीता असफल ठरते. शिक्षणातून व्यक्तिमत्व आणि उत्पादकत्व यांचा विकास झाला पाहिजे .कुटुंब चालविण्याची आपली भागीदारी समर्थपणे पेलण्याची ताकद तिला या शिक्षणातून मिळावयास पाहिजे. कारण परालंबित्वामुळेच स्त्रीला समाजात कनिष्ठ दर्जा प्राप्त झाला आहे. समाजवादी आणि लोकशाही मूल्यांची बांधिलकी राखून नव्या समाज व्यवस्थेत नवीन जबाबदारी घेण्यास मुलींना सक्षम बनवण्याचे मार्गदर्शन प्राचार्य मॅडमनी केले .या प्रदर्शनीमध्ये बीए भाग 1,2 व 3 च्या विद्यार्थ्यांनी स्वहस्तेकलेचा उपयोग करून दिवे विक्रीचे स्टॉल लावण्यात आले .भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्या आराधना वैद्य मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच आणि मोठ्या प्रमाणात दिवे सूद्धा विकत घेतले .त्याचबरोबर इतर प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा दिवे विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती .त्यांना दिवे बनवण्याचे ऑर्डर सुद्धा दिल्या गेल्या. अशा प्रकारे कोरोना काळामध्ये बेरोजगार झालेल्या युवतींना या स्वयंरोजगारामुळे रोजगार प्राप्त होऊ शकतो .आणि आम्ही प्रशिक्षण दिलेल्या युवती समाजात अनेक प्रशिक्षित युवती तयार करू शकते आणि येत्या 2030 वर्षापर्यंत करोडो युवतींना रोजगार मिळवून देऊ शकते या उद्देशाने गृहअर्थशास्त्र विभागाच्या डॉक्टर भडके मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याचे प्रशिक्षण तर दिलेचं.आणि यशस्वीरित्या प्रदर्शनी सुद्धा पार पाडली. त्याना वैशाली वरघट ताईंनी सुद्धा मदत केली.






