आज निलेश विश्वकर्मा वंचित तर्फे तर प्रपाप अडसड भाजपातर्फे दाखल करणार नामांकन – दोघेही नामांकनापुर्वी रॅली काढून करणार शक्तीप्रदर्शन

0
687
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- (शहजाद खान)

विधानसभे साठी नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्या नंतर धामणगाव मतदार संघात सर्वांचे लक्ष लागून असलेले उमेदवार म्हणजे निलेश विश्वकर्मा असून ते आज आपला उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीतर्फे भरणार आहे. काही वेळातच ते भव्य विजयी संकल्प मिरवणुकीसह ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच भाजपाचे प्रताप अडसड सुध्दा आज नामांकन दाखल करणार आहे.

रोज कुठला न कुठला पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर होत असतांना या वर्षी सर्वांसाठी चर्चेच विषय असलेले निलेश विश्वकर्मा हे कोणत्या तारखेला आपले नामांकन दाखल करणार हे स्पष्ट नव्हते. ते आता स्पष्ट झाले असून वंचित बहुजन आघाडीतर्फे आज नामांकन दाखल करणार आहे. आपली उमेदवारी ही जनकल्याणासाठी, गोरगरिबांच्या उत्थानासाठी असल्याचे त्यांनी सांगितले आह. कुऱ्हा रोडवरील त्यांच्या जयहिंद क्रीडा मंडळाच्या कार्यलयापासून विजयसंकल्प यात्रेला सकाळी १० वाजतापासुन प्रारंभ होणार आहे. गोरगरीबांचा व सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून निलेश विश्वकर्मा हे पुढे येत असून त्यांनी मतदार संघातील आपल्या माता, भगिनी, मित्र व संपूर्ण मतदारांना आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी या विजयीसंकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर कालच भाजपातर्फे अधिकृतरित्या जाहीर झालेले प्रताप अडसड हे सुध्दा आज चांदूर रेल्वे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढून नामांकन दाखल करणार आहे. शहरातील राम नगर येथील मैदानावर भव्य पेंडॉल उभारण्यात आला आहे. या दोघांच्याही नामांकन यात्रेमुळे चांदूर रेल्वे शहराला यात्रेचे स्वरूप येणार आहे.