अधिका-याची पूर्ण वेळ हजेरी नसल्याने नप सिंदेवाही चा कारभार चव्हाट्यावर

0
523
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- नगर पंचायत सिंदेवाही येथिल मुख्याधिकारी नगर पंचायत मध्ये नसल्याने सिंदेवाही शहरात अनेक समस्यांना ऊत आला असून कुणाचा पायपोस कुणात नसल्याचे चित्र संपूर्ण सिंदेवाही शहरात दिसून येत आहे. पाऊस आला की शहरातील अनेक रस्त्यावर चिखलाचा वावर, अनेक वॉर्डात कचरा व्यवस्थापनाचा अभाव, रास्ता फोडून नाली खोदणे, नगर पंचायत च्या जागेवर अतिक्रमण, परवानगी न घेता घराचे बांधकाम, गावातील रस्त्यावर अतिक्रमण अश्या अनेक समस्या सिंदेवाही नगरात दिसुन येत आहेत. आपल्या समस्या घेऊन नागरिक नगर पंचायत ये-जा करतात परंतु नगर पंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. सिंदेवाही नगर पंचायत मध्ये नुकतेच सत्तांतर झाले. विकास कामांना गती मिळेल अशी जनतेची अपेक्षा होती परंतु या अपेक्षा फोल ठरत आहे. नगर पंचायतच्या अनेक योजना धूळ खात पडले आहेत. शहरतील अनेक वार्डामध्ये नाल्याचे व रस्त्याचे बांधकाम सुरूच झालेले नाही. ज्या ठिकाणी पक्के रस्ते नाही अशा ठिकाणी रस्ता फोडून नाली खोदलेल्या आहेत परंतु नगर पंचायत चे अधिकारी किंवा पदाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक सुद्धा आपसात नाराजीचा सूर काढताना दिसतात. शिक्षक कॉलोनी मध्ये पक्के रस्ते आणि नाली बांधकाम नाही. नगर सेवकांच्या घरातही पाणी शिरल्याच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या परंतु नगर पंचायत ला जाग अजुनपर्यंत आलेली नाही. शिक्षक कॉलोनी मधील एका ग्रामसेवक ने रास्ता फोडून नाली काढली. घरातील गटाराचे पाणी नगर पंचायतीच्या खुल्या मैदानात साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली परंतु नगर प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही. रस्ता फोडून नाली खोदण्याचे अधिकार नागरिकांना आहे काय? नगर पंचायत च्या रस्त्याचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण करून देणार? नगरातील लोकांना विज, पाणी, रस्ता, आरोग्य या सुविधा पुरविण्याची जबाबदारी कोणाची? अधिकारी व पदाधिकारी यांच्या अलगर्जी पणाचा फटका शहरतील नागरिकांना बसत असेल तर नागरीकांनी कोणाकडे दाद मागावी? असे अनेक प्रश्न शहरातील नागरिकामध्ये निर्माण होत आहे.