साहित्यात जनभावनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे !* डाॕ.प्रतिमा इंगोले ——————————- ——-

0
1513

*”साहित्यात जनभावनांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे !* डाॕ.प्रतिमा इंगोले
——————————- —————
आकोट-
जनमानसात उमटणा-या वेदना आणि संवेदनाचे प्रतिनिधित्व करणा-या नंदकिशोर हिंगणकर यांचे मनमोहोर काव्य संग्रहात जनभावनांचे प्रतिबिंब उमटले आहे.लोकमनाचे जागर करित त्यांनी साहित्यांचे प्रांतांत दमदार पाऊल ठेवले आहे.हा काव्य मोहोर आणखी फुलावा असे मनोगत व-हाडी मातीला सुंगधीत करणा-या व-हाडी साहित्यिका डाॕ.प्रतिमा इंगोले यांनी मनमोहोर कविता संग्रहाचे प्रकाशन करतांना व्यक्त केले.

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे नंदकिशोर हिंगणकर मित्र मंडळाचे वतीने आयोजित
मनमोहोर कविता संग्रहाचे प्रकाशन तथा त्यांचे सेवानिवृत्तीबद्दल कार्यगौरव समारंभात डाॕ.प्रतिमा इंगोले बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले होते.भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त ‘बारोमास’ कादंबरीचे लेखक डाॕ.सदानंद देशमुख ,प्रा.ग.रा. अंबाडकर,जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर ,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर, व-हाडी साहित्यिक गुल्हेरकार नरेंद्र इंगळे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पटोकार,रमाकांत धर्माळे,मातोश्री सुमनताई हिंगणकर ,उत्तराबाई चिकटे आदी मान्यवर साहित्यपीठावर उपस्थित होते.

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे पार पडलेल्या या शानदार सोहळ्याचा प्रारंभ श्रद्धेय वासुदेव महाराज, महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री, वै.पंजाबराव हिंगणकर यांचे पुण्यस्मरण व दिप प्रज्वलनाने झाला.वारकरी दिंडी व पालखीतून आणण्यात आलेल्या ‘मनमोहोर’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन पार पडला.

शासनाचे शिक्षण विभागातून निवृत्त झाल्याबद्दल तथा त्यांचे विविध क्षेत्रातील डाॕ सदानंद देशमुख यांचे हस्ते शाल श्रीफळ व गौरव चिन्ह देवून गौरव करण्यात आला.मानपत्र अॕड.गजानन पुंडकर यांनी प्रदान केले.त्याचे वाचन इंजिनियर रविंद्र वानखडे यांनी केले.यावेळी नंदकिशोर हिंगणकर यांचे जीवनपटाची चित्रफीत प्रक्षेपित करण्यात आली.अतिथींचा यथोचित सन्मान करण्यात आला.

संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था,मध्यस्थी वधूवर सुचक मंडळ,ॐ वासुदेवाय सेवा समिती,न.प.कर्मचारी संघटना,शिक्षक समिती, दर्यापूर शिक्षक संघ ,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, शिक्षक साहित्य संघ ,परवाज परिवार,मनमोहर गृपस्,ग्रामपंचायत कालवाडीसह विविध संस्था व संघटना तथा व्यक्तीगतरित्या नंदकिशोर हिंगणकर यांच सत्कार करण्यात आला.प्रा अंबाडकरांनी मनमोहोराचं अंतरंग उलगडत नंदकिशोर हिंगणकर यांच्या कविता वास्तव प्रश्नावर भाष्य करणा-या आहेत.अल्पाक्षरत्व हे चांगल्या कवितेचं वैशिष्ट असते.त्यादृष्टीने मनमोहर परिपूर्ण असल्याचा अभिप्रायात्मक मत व्यक्त केले.

यावेळी नानासाहेब हिंगणकर , अॕड.गजानन पुंडकर, दिनकरराव गायगोले, प्रा.प्रदिप चोरे, सुरेशराव कराळे, दर्यापूरचे नईम सर, अंबादास लाघे, भैरवी हिंगणकर , सौरभ हिंगणकर यांनी नंदकिशोर हिंगणकर यांचे जीवनपैलूवर प्रकाश टाकला.
प्राचार्य गजानन चोपडे यांनी आपल्या प्रास्ताविकात संयोजनाची भूमिका विशद केली
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डी.आर.साबळे यांनी तर आभार प्रदर्शन राममुर्ती वालसिंगे यांनी केले.

कार्यक्रमाला विनायकराव मोडशे,डाॕ अनघा सोनखासकर,मिराताई कोरपे,शंकरराव चौधरी.दयाराम पाटील,विलासराव चोरे,बाळासाहेब भांबुरकर,मुकूंदराव गावंडे,डाॕ अशोक बिहाडे,सदाशीवराव पोटे,पुरुषोत्तम लाजुरकर,दादाराव पुंडेकर,मोहनराव जायले,अवि गावंडे,महादेवराव ठाकरे अशोकराव पाचडे,जयदिप सोनखासकर,डाॕ.सुहास कुलट,सौ.लता साबळे,दिलिप हरणे,अनिल कोरपे,शिरिष ढवळे,कमलताई गावंडे,बाळासाहेब फोकमारे,नागोराव वानखडे,मधुकरराव पुंडकर,भाष्करराव डिक्कर,वाल्मिक भगत,गजानन ओळंबे,प्रदिप ओळंबे,बंडू कुलट,दिपक वानखडे ,गजानन निमकर्डे,रितेश निलेवार,महेद्र राऊत वृंदाताई मंगळे,संजय आठवले,प्रदिप रावणकार,मोहन नाथे,सर्फराज खान,नगरपरिषद आकोट व दर्यापूरचे शिक्षकवृंद, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी,पत्रकार तथा नंदकिशोर हिंगणकर यांचा मित्र परिवार,नातेवाईक ,हितचिंतक व कालवाडी ग्रामस्थ व साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

*————————-*
*साहित्य माणसाशी माणूस जोडतो!* डाॕ.सदानंद देशमुख
————————-
साहित्य निर्मिती ही अनुभवाशी निगडीत बाब आहे.त्या अनुभवांना शब्दरुप देवून झालेली साहित्य निर्मिती सद् विवेकाची श्रीमंती आहे.त्यातून समाजाचे संवर्धन होते.असे विचार डाॕ सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले…
आपले विचार मांडतांना त्यांनी नंदकिशोर हिंगणकर यांनी माणूस जोडून या परिसराला मोठे केले.त्यांचे साहित्याचा मोहोर असाच फुलत राहो अशा आशयाचे उद्गार काढले.
श्रद्धासागर क्षेत्री साहित्यिकांच्या विचार ऐकण्यासाठी रसिकश्रोत्यांनी गर्दी केली होती.
जळगांव नहाटे येथील वारकरी भजनी मंडळाचे दिंडीने वातावरण भारावून गेले होते.
————————-
👆चौकट