राष्ट्राची सर्वांगिण उन्नती करण्याचा रा.स्व.संघाचा निर्धार ;वक्ता शैलेश जोशी यांचे उद्बोधन ;विजयादशमी उत्सव व पथसंचलनाला नगरवासींचा मोठा प्रतिसाद ;चित्तवेधक प्रात्यक्षिकांचे दर्शन

0
704
Google search engine
Google search engine

राष्ट्राची सर्वांगिण उन्नती करण्याचा रा.स्व.संघाचा निर्धार

;वक्ता शैलेश जोशी यांचे उद्बोधन

;विजयादशमी उत्सव व पथसंचलनाला नगरवासींचा मोठा प्रतिसाद

;चित्तवेधक प्रात्यक्षिकांचे दर्शन

अकोट,ता.३ – राष्ट्राची सर्वांगिण उन्नती करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे.भारत मातेला जगामध्ये उच्चतम अश्या पहिल्या स्थानावरती आरुढ झालेले बघण्याचे स्वप्न संघाने बघितले आहे.विजयशालीनी,संघटित शक्तीच्या आधारावर धर्माचं संरक्षण करत हे ध्येय साध्य करता येईल,असा हितोपदेश विद्याभारतीचे विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी उद्बोधन करतांना सुचविला.

बुधवार(ता.दोन) ला सायंकाळी,काँलेज रोडवरील श्री.सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित विजयादशमी उत्सवात शैलेश जोशी बोलत होते.संघपिठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यांचल स्कूलचे संचालक दिनेश भुतडा उपस्थित होते.तर तालुका संघचालक सुधिर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम शस्त्र पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर ध्वजारोहण करण्यात येऊन ध्वजप्रणाम करण्यात आला.हेमंत सिंदेकर यांनी प्रार्थना म्हटली.तद्नंतर चित्तवेधक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.प्रत्युच प्रचलन सम्राट शिंगणारे यांनी केले.सांघीक गित जय ठाकर यांनी म्हटले.सांघीक व्यायाम योग सुनिल देशमुख व ओमप्रकाश डेमला यांनी घडवून आणला.नियुध्द व सामुहिक समता वृषभ महल्ले यांनी सादर केले.योगचाप योगेश दाभाडे व मनोरे दिलीप भाष्कर यांनी सादर केले.अमृतवचन चिन्मय पाटील यांनी म्हटले.सुभाषित भार्गव पोफळी यांनी सांगितले.वैयक्तिक गित साहेबराव तेलगोटे यांनी म्हटले.योगासने जयेंद्र चावडा व सुधिर रेलकर यांनी सादर केली.

मान्यवरांचे स्वागत तालुका संघचालक सुधिर महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

नगर कार्यवाह नितीन शेगोकार यांनी प्रस्तावनेत विजयादशमीला पाच स्वयंसेवकांपासून श्रीगणेश झालेला रा.स्व.संघ विश्वव्यापक झाला आहे.तसेच संघाच्या ६१ हजार नियमित शाखा कार्यरत आहेत.संघाद्वारे सहा उत्सव साजरे केले जातात.संघातर्फे एक लाख ५० हजार सेवाकार्य चालतात,  आदी माहिती दिली.

प्रमुख अतिथी दिनेश भुतडा यांनी राष्ट्रभाषेत ओजस्वी मार्गदर्शन केले.शिक्षण ही सेवा आहे;तसेच सेवेचे दुसरे नाव रा.स्व.संघ आहे,असे भुतडा यांनी सांगितले.त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व प्लॉस्टीकला जीवनातून हद्दपार करावे,असे सांगितले.

प्रमुख वक्ता शैलेश जोशी यांनी हिंदू समाज जागृत होऊन स्वराज्य स्थापन करु शकतो,हे छत्रपति शिवाजी महाराजांनी सिध्द केले.तसेच सतत विजयाचे स्मरण करत रहा,असे ते म्हणाले.नित्यनियमित संघाच्या शाखेत जाऊन संस्कार ग्रहण करुन तयार झालेला स्वयंसेवक हा समाजामध्ये जाऊन परत संघाची शाखा चालवतो.यातूनच रा.स्व.संघाचा विस्तार झाला आहे,असे सांगितले.त्यांनी संघटित शक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी तिरुपती-तिरुमलाला झालेल्या जनजागरण आंदोलनाची माहिती दिली.या आंदोलनापूढे सरकारला झुकावे लागल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी सामुहीक शक्ती संदर्भात रामजन्मभूमि आंदोलनाचे स्मरण करुन दिले.तसेच गोमाता,गंगामाता व भारतमाता नागपूर येथील यात्रेचा उल्लेख केला.त्यांनी जम्मू आणि काश्मिर ३७० कलमाद्वारे देशापासून वेगळे ठेवण्याचे जे षडयंत्र सुरु होते;ते हाणून पाडण्याचं कार्य राजकिय इच्छाशक्तीने केले.तसेच ३७० व ३५ अ कलम हद्दपार करण्यात आले.वास्तविक राजा हिरिसिंगांनी विलीनीकरणाची प्रक्रिया पुर्ण केली होती;त्या वेळी संविधान अस्तित्वात आले नव्हते.नंतर जे संविधान लागू झाले;ते जम्मू-काश्मिर मध्ये लागू होऊ नये म्हणून शेख अब्दूल्लांनी प्रयत्न केले,अशी माहिती सुध्दा त्यांनी दिली.ते पूढे म्हणाले की,रा.स्व.संघ संघटन बांधण्यासोबत समाज जागरणाचेही कार्य करतो.संघ स्वयंसेवकांनी समाज परिवर्तनासोबत व्यवस्था परिवर्तनाचेही कार्य सुरु केले आहे.शिक्षण क्षेत्रात विद्याभारतीचे कार्य देशभरात सुरु आहे.मातृभाषेतून शिक्षणाचा संघाचा आग्रह आहे.ऐकण्यामुळे आकलन शक्ती वाढून भाषा शिकता येते.शिक्षा व न्याय व्यवस्थेत परिवर्तनाची गरज आहे.सिमावर्ती भागात सिमा जागरण मंच मोठे कार्य करत आहे.सहकार भाराती,संस्कार भारती,अ.भा.विद्यार्थी परिषद,विश्व हिंदू परिषद,विज्ञान भारती सारख्या सुमारे ४२ स्वतंत्र स्वायत्त संघटना ह्या रा.स्व.संघाच्या प्रेरणेनी व्यवस्था परिवर्तनाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर सातत्याने करत आहेत.एखादा निर्णय समाजाने स्विकारावा म्हणून समाजाचे मन तयार करण्याचं कार्यही केलं जातं,असे ते म्हणाले.

या उत्सवात स्वागत,प्रास्ताविक,वक्ता व अतिथींचा परिचय नगर कार्यवाह नितीन शेगोकार यांनी करुन दिला.उत्सवात मुख्य शिक्षक म्हणून रोशन लावणे यांनी जबाबदारी सांभाळली.ध्वजावतरणानंतर उत्सवाची सांगता झाली.उत्सवात नगरवासींची मोठी उपस्थिती होती.

*चौकट…

*पथसंचलनाला नगरवासींचा प्रतिसाद*

विजयादशमी उत्सवानिमित्त अकोट नगरातून काढण्यात आलेल्या रा.स्व.संघाच्या शिस्तबध्द सघोष पथसंचलनाला नगरवासींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नगरवासींनी मार्गावर सडा संमार्जन करुन विवीध रंगावलींनी पथसंचलनाचे स्वागत करत स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली.घोषदंडाने सुध्दा आकृष्ट केले.

*फोटोओळी…

१)अकोटला सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात उपस्थित वक्ता शैलेश जोशी,प्रमुख अतिथी दिनेश भुतडा व तालुका संघचालक सुधिर महाजन…

२)मान्यवरांसमोर स्वयंसेवकांचे चित्तवेधक मनोरा प्रात्यक्षिक…