प्लॅस्टिक मुक्त अकोट साठी नगर परिषद चे विविध उपक्रम

0
1136
Google search engine
Google search engine

प्लॅस्टिक मुक्त अकोट साठी नगर परिषद चे विविध उपक्रम

अकोट तालुका प्रतिनिधी
शासनाचे महत्वपूर्ण अभियान स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधीजी च्या 150 व्या जयंती निमित्त प्लॅस्टिक मुक्त ,प्लॅस्टिक विलगिकरन याकरिता शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले आहे. त्याअंतर्गत नगर परिषद आकोट स्वच्छ शहर ठेवण्याकरिता मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवत आहे.यामध्ये स्वच्छतेचि शपथ घेऊन शहरात लोकांमध्ये ,व्यापारी वर्गात जनजागृती करीता शाळकरी मुलांनी महात्मा गांधीजी ,अब्दुल कलाम, गाडगेबाबा व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा करून मुख्याध्यापक तथा शिक्षक व नगर परिषद कर्मचारी यांच्या सह सर्वांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला .त्यानंतर बस स्थानक व बाजार पेठेत प्लस्टिक गोळा करणे ,तथा स्वछता करून श्रमदान केले, त्यानंतर व्यापारी वर्गात प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली.शाळेतील सर्व मुलांनी आपल्या घरातील प्लास्टिक गोळा करून जमा केले व महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली, या सर्व उपक्रमात नरसिंग शाळा, नगर परिषद च्या सर्व मराठी व उर्दू शाळेच्या मुलांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमात नगर परिषद कार्यालय अधीक्षक गौरव लोंदे ,आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया ,विजय रताळे, अनिकेत फुके, सुरेंद्र सोनोने, रघुनाथ बेराड व शाळांचे मुख्याध्यापक अंबादास लाघेसर, पिंजरकर सर,वडाळ सर, तरोळे सर व शिक्षक तथा नगर परिषद विभाग प्रमुख व अधिनस्त कर्मचारी यांनी हजेरी लावली