कॉम्रेड उत्तम माने यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदाचा राजीनामा

0
876

एका सच्च्या कॉम्रेड वर अशी वेळ का आली ?

परळी (प्रतिनिधी)

दिपक गित्ते,नितीन ढाकणे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बीड जिल्हा सचिव कॉम्रेड उत्तम माने यांचे वडील यशवंतराव नामदेवराव माने यांचे आयुष्य कम्युनिस्ट विचारसरणी गेले उत्तम माने गेली 35 वर्ष झालं विद्यार्थिदशेपासून कम्युनिस्ट चळवळीकडे जोडले गेले होते त्यांनी दोन वेळेस परळी तालुका सचिव पदाची जबाबदारी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली गेल्या दोन वर्षापासून पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सचिव पदाची जबाबदारी दिली पक्षाच्या ध्येय  धोरणानुसार पक्ष व जनसंघटना वाढीसाठी प्रयत्न केले परळी विधानसभा  लढण्यात यावी असा निर्णय तालुका कमेटी मध्ये घेतण्यात आलेला असताना परळी विधानसभा  लढवण्या साठी राज्य कमिटीला सतत माहिती देऊन सुद्धा राज्य कमिटीने राष्ट्रवादी कॉग्रस ,काँग्रेस बरोबर आघाडी केली आहे त्यामुळे परळी विधानसभा लढण्यात यवू नये असे सांगितल्या मुळे व सतत अंतर्गत गटबाजीला त्रासून राजीनामा दिलेलं आहे .

उत्तम माने यांनी गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उद्भवणाऱ्या  प्रश्नावर अनेक आंदोलने केली आहे

कम्युनिस्ट चळवळीचे विचार निवडणुकीच्या माध्यमातून तरून वर्गासमोर ठेवणे व वास्तव परिस्थिती जनते समोर मांडण्याची हि संधी असते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने सतत कम्युनिस्ट पक्षाशी दगा बाजी केलेली आहे आणि पून्हा पक्षाचा अदेश येतो त्यांनाच मदत करा अशा निर्णयाला कंटाळून राजीनामा दिला आहे.