कांबळे बंधूंकडून दर्जेदार व नक्षीदार साहित्याची निर्मिती आता परळीत

0
867
Google search engine
Google search engine

परळी 

महाराष्ट्र ही संताची परंपरा असलेली संतभुमी असून पंढरपूरसह इतर देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो दिंड्या पायी जात असतात. या दिंड्यांमध्ये छत्रधारी, चामरधारी, झेंडेकरी, मशालधारी अशी मानाची पदे असून या पदांना वेगळा पोशाख व साहित्य असल्याची परंपरा आहे. हे साहित्य आता परळीत उपलब्ध झाले असून मुक्तेश्वर कांबळे व बालाजी कांबळे व त्यांच्या बंधूंकडून दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असल्याने दिंडी चालकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य उपलब्ध व्हावं या उद्देशाने हौशी कलाकार मुकेश कांबळे व बालाजी कांबळे यांनी दिंड्यासाठी लागणारे साहित्य परळीतच बनवणे सुरू केले ,पंढरपुर येथे आषाढी व कार्तिकी यात्रेनिमित्त शेकडो दिंड्या जात असतात तसेच आळंदी, देहू, पैठण, कपिलधार सारख्या धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षी दिंड्या रवाना होत असतात. या  दिंड्या मध्ये वेगवेगळे वैशिष्ट्ये असते. प्रत्येक दिंडीत चामुरधारी, छत्रधारी, झेंडेकरी, व मशालधारी, ही मानाची पदे असतात. यासाठी एक वेगळा प्रकारचा पोशाख प्रचलित आहे. हा पोशाच सर्वसाधारणपणे बाजारपेठेत उपलब्ध होत नाहीत. परळीतील जिव्हेश्वर टेलरचे संचालक मुक्तेश्वर कांबळे (9011772477) बालाजी कांबळे (9822770588), नवनाथ कांबळे, जगदीश कांबळे  हे आपल्या कलाकुसरीने व नक्षी कामाने हे साहित्य उपलब्ध करत आहेत.

यामध्ये रेशीम,पालखी ची पिंजरी तसेच पिंडीवरील वस्ञ व ईतर अनेक प्रकारचे हे साहित्य उपलब्ध आहेत. परळीसारख्या छोट्या शहरात दिंड्यांचे साहित्य उपलब्ध झाल्याने वारकरी व दिंडी चालकांची मोठी सोय झाली आहे.