अखेर देवेंद्र भुयार यांनी केला आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल – मोर्शी विधानसभा मतदार संघात उत्साहाचे वातावरण !

0
1902
Google search engine
Google search engine

हजारो कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ! 

रुपेश वाळके/ विशेष प्रतिनिधी –

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आघाडीचा उमेदवार कोण असनार अशी जोरदार चर्चा रंगत असतांना विविध नावे पुढे आली मात्र शेवटच्या क्षणी मोर्शी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदार संघ मिळाला आहे.  ‘स्वाभिमानी’ला जिल्ह्यात एकच जागा मिळाली.  वरूड मोर्शीतून देवेंद्र महादेवराव भुयार यांनी उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते शेवटी त्यांनीच आघाडीचा उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले .

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी गेल्या नऊ  वर्षांपासून सातत्याने रस्त्यावर उतरणार्‍या,अनेकदा तुरुंगात जाणारा या झुंजार नेत्याने गेल्या काही वर्षात अमरावती जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. संत्रा , कापूस-सोयाबीनच्या ज्वारी, मिरची च्या हमीभावासाठी , शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींसाठी , शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन ,आदिवासींचे प्रश्न ,  शेतकऱ्यांची विजेची समस्या , विद्यार्थ्यांच्या समस्या , रुग्णांच्या समस्या , यासारख्या असंख्य प्रश्नावर  ते सातत्याने लढत  होते ., पण शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक , अडवणूक , त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणाऱ्या अधिकारी व शासनाच्या विरोधात  शेतकर्‍यांच्या हक्कासाठी  आंदोलने केली . मात्र  शेतकाऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्या  नेत्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात व त्यांच्या  वेळ काढू धोरनाबद्दलही देवेंद्र भुयार यांनी  दंड थोपटले होते. सातत्याने मोर्चे, आंदोलने, पदयात्रा असा त्यांचा धडाका सुरू होता. देवेंद्र भूयारांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना  कोणालाही सोडले नाही. ज्यांनी शेतकर्‍यांची पिळवणूक केली  त्या सर्वपक्षीय भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध त्यांनी आघाडीच उघडली. स्वाभाविकच हितसंबंध दुखावलेले सत्तेतले सारे वाटेकरी त्यांच्याविरुद्ध एकत्र आलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देवेंद्र भुयार यांनी  केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सरकारी संपत्तीचे नुकसान झाले. त्यांच्यामुळे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना राजकीय धोका आहे, असा निष्कर्ष काढण्याचे आदेश प्रशासनाच्या  सरकारी अधिकार्‍यांना मिळाले होते त्यामुळे त्यांना तडीपार सुद्धा करण्यात आले होते . ऐन जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर  राजकारणात असे प्रस्ताव कधी उकरून काढायचे आणि त्यानुसार कधी कारवाई करायची, याची काही गणिते असतात .  जोपर्यंत देवेंद्र भुयार  सत्ताधार्‍यांच्या संघटनेत होते तोपर्यंत त्यांच्या विषयात काही अडचण  नव्हती . मात्र गेल्या नऊ वर्षे पासून देवेंद्र भुयारांनी सत्ता धाऱ्यांच्या संघटनेला राम राम ठोकून आपला मोर्चा मोर्शी वरुड़  मतदारसंघाकडे वळविला. जिल्ह्यातील सत्ताधारी देवेंद्र भूयारांच्या आंदोलनाच्या धडाक्याने हादरून गेले होते .  देवेंद्र भुयार यांच्या आंदोलंनामुळे राजकीय नेत्यांची चांगलीच  फजिती होत होती त्यामुळे त्यांना तडीपार करण्यात आले मात्र त्याचा फायदा देवेंद्र भुयार यांनाच झाला आणि ते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आले . आणि ते नेहमी जनतेच्या संपर्कात राहून त्यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाचा प्रहार करून जनतेच्या समस्या सोडविल्या त्यामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघात देवेंद्र भुयार यांची पकड मजबूत असून काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवकांचा मोठा सहभाग देवेंद्र भुयार यांच्या सोबत असल्यामुळे मोर्शी विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .आज मोर्शी येथे उमेदवारी अर्ज भरतांना काँगेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी बांधव व हजारो युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .