काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज मेळावा

88

परळी प्रतिनिधी

परळी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आयचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचा मेळावा शनिवार दि 5 रोजी सकाळी 11 वा अक्षदा मंगल कार्यालय शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तालुका व शहर काँग्रेस कमिटीने दिली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला परळी शहर व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस ,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस ,सेवादल ,अल्पसंख्यांक सेल ,मागासवर्गीय सेल ,राजीव गांधी पंचायत राज संघटन आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, शहराध्यक्ष बाबुभाई नंबर दार युवक काँग्रेसचे परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे ,ऍड संजय जगतकर, ऍड मनोज संकाये , प्रशांत तोतला, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे ,शहराध्यक्ष किशोर जाधव अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जम्मू भाई, शहराध्यक्ष बबलू सय्यद, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ माणिक कांबळे ,शहराध्यक्ष मनोहर मुंडे ,सेवादलाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, शहराध्यक्ष नागेश व्हावळे , पंचायत राज संघटन चे तालुकाध्यक्ष यशवंत सोनवणे ,शहराध्यक्ष नवनाथ क्षीरसागर ,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष विजयमाला घाडगे ,शहराध्यक्ष अनिता पवार आदींनी केले आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।