ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे संदिप गडम्मवार यांच्या सह अनेक उमेदवारांनी केले नामकंन दाखल

138

भाजप – शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार संदिप गड्डमवार यांनी शक्ती प्रदर्शन करत नामकंन केले दाखल

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी विधानसभेकरिता आज भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार संदिप गडम्मवार यांनी आज ब्रम्हपुरी शहर भगवामय करत नामकंन दाखल केले. यावेळी माजी राज्यमंत्री शोभाताई फडणवीस, खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर आदींची उपस्थिती होती. यावेळी आज संभाजी ब्रिगेड कडुन जगदीश पिल्लारे, विनोद झोडगे कम्युनिस्ट पार्टी, गुरुदेव भोपये अपक्ष, सुशील वासनिक बहुजन समाज पार्टी, धानु वलथरे अपक्ष, अजय पांडव अपक्ष, पोर्निमा भिलावे अॉल इंडिया हिंदुस्तान क्रॉगेस पार्टी, मुकूदा मेश्राम बहुजन समाज पार्टी, विनय बांबोळे अपक्ष, अनुकूल शेन्डे अपक्ष या उमेदवारांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकरिता आज नामकंन दाखल केले. आज सुध्दा दोन उमेदवारांनी सात अर्ज फॉर्म घेतले व आज पर्यंत 28 नामकंन दाखल केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी क्रांति डोंबे यांनी दिली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।