रणधुमाळी जळगाव जामोद व खामगावं मतदारसंघाची…

207

शेगांव/जळगाव जामोद:- जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणारे खामगाव मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर पाटील गणेश यांनी यांच्या हजारो समर्थकांसह रजत नगरीत आई जगदंबेच दर्शन घेवुन भव्य रैली काढून आज नामांकन भरले
तर दुसरीकडे जळगाव जामोद मतदार संघातून काँग्रेसच्या स्वाती वाकेकर ,प्रसन्नजीत पाटील, संगीतराव भोंगळ, यांनी आपले अर्ज दाखल केले विधानसभा निवडणुकीमध्ये खामगावला नवीन उमेदवार तर जळगाव जामोद मधे तेच ओळखीचे चेहरे असून खामगाव मध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्ये चुरशीची लढत राहू शकते.
तर जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये जनतेशी परिचित असणारे प्रसन्नजीत पाटील आणि आमदार संजय कुठे यांच्यात लढत होईल असं चित्र सध्यातरी मतदारसंघात दिसत आहे ,त्यापाठोपाठ तीन वेळा आमदारकी निभवलेले कृष्णराव इंगळे यांची कन्या स्वाती वाकेकर ही काँग्रेसची उमेदवारी घेऊन रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून संगीतराव भोंगळ हे वंचित आघाडी च्या तीकीटावर उमेदवार आहेत , भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार संजय कुठे हे रिंगणात आहेत, मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला प्रसेनजित पाटील भारिप पक्षाकडून दुसऱ्या क्रमांकावर राहिले, परंतु यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे त्यांना जनता किती साथ देईल हे सांगणं सध्यातरी अवघड आहे, पण मतदारसंघाचे चित्र पाहता लढत ही प्रसन्नजित पाटील आणि संजय कुठे यांच्यातच होईल असं आज तरी दिसत आहे, या संपूर्ण लढाईवर वंचित आघाडीचे उमेदवार संगीतराव भोंगळ किती परिणाम पडतील आणि त्यांना जनता किती पसंत करेल हे पाहण्याजोगे राहील , पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या स्वाती वाकेकर या महिला असून त्यांना मतदारसंघातील महिला मतदार किती पाठिंबा देतात हे पाहावं लागेल ,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।