अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही ,महसूल विभाग व्यस्त असल्याचा घेत आहे फायदा,आरोपीला अटक

0
1283
Google search engine
Google search engine

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वर पोलिसांची कार्यवाही ,महसूल विभाग व्यस्त असल्याचा घेत आहे फायदा,आरोपीला अटक

अमरावती//चांदुर बाजार:-

मागील काही दिवसापासून चांदुर बाजार तालुक्यातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती ची वाहतूक सुरू आहे या कडे महसूल विभाग आणि पोलीस विभाग याच्या बोटावर मोजण्या इतक्या कार्यवाही सुरू असून चांदुर बाजार पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि आरोपीला अटक केली आहे.

पोलिस कॉस्टबल महेश काळे   गुप्त माहिती मिळाली की एक इसम कुरळपूर्णा ते जवळा शहापुर कड़े आपले ट्रैक्टर चे टालित रेती भरून येत आहे वरुन सदरची माहिती ठानेदार याना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक  रहाटे  रवाना होऊन आरोपी नामे शैलेश प्रकाश अर्ड्क वय 38 वर्ष याला ट्रैक्टर सह थाबवीले असता त्याला विचारपुस केली असता त्याच्या कड़े कोणत्याही प्रकारचा परवान नाही असे सांगितले.
सदर ट्रैक्टर फार्मत्रक 45  कंपनीचा  की अंदाजे 400000 व टाली की अंदाचे 100000 व एक बरर्स रेती 4000 रु असा ऐकून 5,04000 रु चा माल  जप्त करून त्यावर   कलम 379 भादवी सह कलम 9,15 पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.