चांदूर (रेल्वे) बाजार समितीच्या आवारात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

97
चांदूर रेल्वे – (शहजाद खान)
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी खाजगी व्यापारी यांच्या वतीने सोयाबीन खरेदीचा शुभारंभ सभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे व्यापारी पुरुषोत्तम बनसोड यांनी शुभारंभाचा सोयाबीन खुल्या लिलाव पद्धतीमध्ये ३१११ रूपये ही सर्वात जास्त बोली बोलून सोयाबीन खरेदी केली. शुभारंभाचा मान चांदूर रेल्वे येथील शेतकरी रूपेश भोयर यांना मिळाला. सदर शेतकऱ्यास सभापती, उपसभापती,  आडते, व्यापारी मतदार संघाचे संचालक तसेच उपस्थित संचालक यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले व वजन काट्यांचे पूजन करून शेतकऱ्यांनी आपली नवीन हंगामातील शेतमाल जसे कापूस,  सोयाबीन, तूर, उडीद, मूग व इतर शेतमालाला सुद्धा बाजार समितीच्या अहवालावर चांगले भाव मिळत असल्यामुळे आपला शेतमाल विक्री करिता चांदूर (रेल्वे) बाजार समितीच्या आवारात आणावा असे आवाहन प्रदीप वाघ यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती भानुदास गावंडे, संचालक प्रभाकर वाघ,  अशोक चौधरी, अडते व्यापारी दीपक जालान, किशोर गंगण, सुधीर गंगण, रोशन जालान, नरेश गावंडे, अनिल गावंडे, सचिन मोदी, अक्षय जैन, दयाचन्‍द चांडक, सचिन झोपाटे, राजू वऱ्हाडे, मनीष राऊत, बाळा होले, पांडुरंग गाडेकर, पवन धावडे तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।