ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. टी पी मुंडे यांचा हजारो समर्थकांसह पंकजांना साथ देण्याची केली घोषणा

63

●परळीची काॅग्रेस विसर्जित करण्याची केली घोषणा

●पंकजाताई महाराष्ट्राची वाघिण, मुंडे घराण्याची खरी शान

●धनंजय मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या लेकीला त्रास दिला

●पंकजाताई यांचा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करण्याचा केला निर्धार,

●पंकजाताई माझी लेक, चुलता म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार

 

परळी वैजनाथ( प्रतिनिधी )
संपूर्ण राज्यामध्ये ज्या मतदारसंघाची चर्चा होत आहे अशा परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांना मोठा हादरा बसला आहे कारण महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रा टि पी मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील अक्षता मंगल कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना साथ देण्याचा निर्धार केला.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण पंकजा ताईंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा असा आग्रह धरला प्रा टी पी मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतला मेळाव्यास मोठ्या संख्येने विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

अनेक वेळा शरद पवार, धनंजय मुंडे व काँग्रेसच्या काही वरिष्ठांनी काँग्रेस संपविण्याचे पुरेपूर असे प्रयत्न केले मुद्दाम अनेक वेळा मला डावल गेलं असेही प्रा. टी. पी मुंडे म्हणाले त्यामुळे कार्यकर्त्यांचा झालेल्या सर्व प्रकाराबद्दल रोष होता. तो रोष आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना व्यक्त करता आला सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की एकदा एक भव्य असा मेळावा आपण परळी शहरामध्ये घेतला पाहिजे व मेळाव्याच्या माध्यमातून आपण होणाऱ्या अन्यायावर निर्णय घेतला पाहिजे भविष्यातील निर्णय आपल्याला घ्यायचा आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आजचा हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची आपापली मते व्यक्त केली सर्व पदाधिकाऱ्यांचे मत ऐकल्यानंतर प्रा मुंडे सरांनी आपला निर्णय व्यक्त केला व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना साथ म्हणून लाखोंच्या मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला
यानंतर प्रा टीपी मुंडे म्हणाले की धनंजय मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या लेकीला त्रास दिला,राजकारणात पाय ओढण्याचे काम केले, असाच त्रास आम्हाला ही दिला त्याचेच रूपांतर आज मेळाव्याच्या निमित्ताने होत आहे, ज्या मुंडे साहेबांनी तुम्हाला सर्व काही दिले त्यांच्याशीच गद्दारी केली, पंकजाताई माझी लेक, चुलता म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असे टी पी मुंडे म्हणाले, गुंडगिरी आणि दबावाला बळी पडू नका, जशास तसे उत्तर देणार
पंकजाताई महाराष्ट्राची वाघिण, मुंडे घराण्याची खरी शान, त्यांच्या जादूचा कांडीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात, पंकजाताई यांचा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करण्याचा केला निर्धार आपले विचार व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,
प्रा. टी पी मुंडे काकांना सन्मानाची वागणूक भारतीय जनता पार्टी कडुन मिळेल अशी ग्वाही देते अशा व्यक्तीमत्वाचा सन्मान करणे ही माझी जबाबदारी आहे.
असे पंकजा मुंडे म्हणाल्या यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अनेक वेगवेगळ्या कमिटीच्या अध्यक्षांचे गळ्यात गमछा घालून स्वागत केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रा टी पी मुंडे वर निष्ठा असणारे पदाधिकारी कार्यकर्ते महिला-पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।