*कडेगावसह तालुक्यात अर्बन मल्टिपल निधी लवकरच नावलौकिक मिळवेल*

0
732

*कडेगाव* (प्रतिनिधी)

कडेगाव अर्बन मल्टिपल निधी ही नूतन बँक वर्षभरात चौफेर यश संपादन करून नावलौकिक मिळवेल असा आत्मविश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. कडेगाव अर्बन मल्टिपल निधी या शाखेचे उदघाटन सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटना सहकार आघाडीचे अध्यक्ष संजय कोल्हे हे होते .जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले की,कडेगाव सारख्या ग्रामीण भागात कडेगाव अर्बन बँक निर्मिती होते ही एक अभिमानास्पद बाब आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहचून लवकरच आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करील. या बँकेसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य वेळोवेळी मिळेल संजय कोल्हे म्हणाले की शेतकरी संघटनेच्या तरुण व तडफदार नवनाथ पोळ यासारख्या कार्यकर्त्यांने सहकारात पाऊल टाकलेआहे.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बुडवेल शेतकरी असे संबोधले जाते. परंतु याच बडुब्यानी एकत्र येत कडेगाव सारख्या तालुक्याचे ठिकाण अर्बन मल्टीपल निधी बँक नव्याने चालू करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बँक लवकरच नावा रूपास येईल असे मत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ पोळ यांनी केले यावेळी कडेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होती सूत्रसंचालन शाखाधिकारी समीर तांबोळी यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र पोळ यांनी केले