*मोर्शी विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरुवात- देवेंद्र भुयार आणि डॉ अनिल बोंडे यांच्यात लढत*

0
1884
Google search engine
Google search engine

सर्व पक्षीय नेते मंडळी लागली कामाला 

प्रचारासाठी अल्पावधी; उमेदवारांची धावपळ 

देवेंद्र भुयार आणि डॉ अनिल बोंडे यांच्यात होणार लढत 

 

रुपेश वाळकेे – विशेष प्रतिनिधी /

मोर्शी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता उमेदवारांना प्रचारासाठी दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे या अल्पावधीत संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी, प्रचारफेरी, चौक सभा याच्या नियोजनासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघ. अमरावती जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून त्याकडे बघितल्या जाते . हा मतदारसंघ प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. ड्राय झोन चे ग्रहण लागलेला तालुका म्हणून ओळखल्या जात असून  संत्रा हे प्रमुख पीक असलेल्या या मतदारसंघात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा अभाव आणि संत्र्याचे पडलेले भाव आणि संत्रा बागांसाठी पाण्याची अनुपलब्धता , बेरोजगारी , ड्राय झोन चे ग्रहण लागलेला तालुका म्हणून ओळखल्या जात असून या वर्षी भीषण दुष्काळामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनानी मोठ्या मेहनतीने तयार केलेली लाखो संत्रा झाडे पाण्याअभावी वाळल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे ,  हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न आहेत .

अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला जातो.  या मतदारसंघाचं नाव मोर्शी असलं तरी पूर्ण वरुड तालुक्याचा या मतदारसंघात समावेश होतो.

विधानसभा निवडणुकीत यावेळी माघारीच्या दिवसापर्यंत उमेदवारांचा सस्पेन्स राहिला होता. उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारीच्या वेळेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यात उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत नसलेली मंडळीदेखील मैदानात राहिल्यामुळे त्यांना प्रचारासाठी अवघे दहा-अकरा दिवस मिळणार आहेत.

याच गडबडीत दसर्‍याच्या दिवशी उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्ष यांनी आघाडी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांना पाठिंबा देऊन निवडणूक रिंगणात उतरविले असल्यामुळे मोर्शी वरुड मतदार संघामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळत असून मतदार संघातील मतदार त्यांच्यासाठी लोकवर्गणी गोळा करतांना दिसत आहे , तसेच भारतीय जनता पार्टी व युती तर्फे  कृषी मंत्री डॉ अनिल बोण्डे हे मतदार मोर्शी विधानसभा मतदार संघातून सलग दोनदा निवडून आले असून यांना सुद्धा निवडनुक रिंगणात प्रचारासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे .यांच्यासह निवडणूक रिंगणात उभे असलेले ईतर पक्षाचे व अपक्ष उमेदवार आपला जोरदार प्रचार करतांना  दिसत आहे . मोर्शी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या समस्या , युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न , ड्राय झोन , संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून शेतकरी हवालदिल झाला आहे निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कश्या पद्धतीने उत्तरे देऊन कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या वेळेस मोर्शी विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असून सर्वच पक्षाच्या उमेदवारांना आता मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली असून घरातून पहाटे साडेसहा वाजता बाहेर पडून प्रचाराचे काम सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सुरू केले आहे. यात पक्षाच्या प्रचार कार्यालयात जाण्याचे टाळत उमेदवारांनी निवासस्थानाजवळ व ठराविक भागात प्रचार कार्यालय थाटत आता प्रचाराचे नियोजन सुरू केले आहे.

याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रचाराचे नियोजन केले जात असून पहिल्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारफेर्‍यांना प्रारंभ झाला आहे. प्रचार फेर्‍यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मतदारांपर्यंत जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात रात्री उशिरापर्यंत जास्तीत जास्त भागातील कार्यकर्ते व मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरू झाली आहे. पक्षांच्या स्टार प्रचारक नेत्यांच्या मोठ्या सभांचे नियोजन अद्याप न झाल्याने पहिल्या टप्प्यात पायी प्रचारावर भर देण्यात आला आहे .