अमरावती जिल्ह्यातील मतदार संघात सोशल मीडियावर उमेदवार याचा प्रचाराचा धुमाकूळ

252

अमरावती जिल्ह्यातील मतदार संघात सोशल मीडियावर उमेदवार याचा प्रचाराचा धुमाकूळ,

बादल डकरे अमरावती

आपण जनतेपर्यंत कसे पोहचू आणि आपल्याला मते मिळवण्यासाठी उमेदवार सोशल मीडियाच्या सर्वंच माध्यमांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. सोशल मीडियावरील हा प्रचार परवानगी न घेताच सर्रास सुरू झाला आहे. उमेदवारांना प्रचारासाठी सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. राजकीय पोस्टवर आयोगाची सध्या करडी नजर असली तरी उमेदवारांकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सोशल मीडियावरील पोस्टने हव्या त्या मतदारांपर्यंत अगदी सहज पोहोचता येते. कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून खास तज्ज्ञही नियुक्त करण्यात आले आहेत. असे असले तरी सोशल मीडियावर प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून रीतसर निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. एक-दोन अपवाद वगळता उमेदवारांकडून अशा परवानगी घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांनी एखादी पोस्ट अपलोड करण्यापूर्वी त्या पोस्टमध्ये कोणता संदेश आहे? कोणती माहिती त्यातून प्रसिद्ध केली जाणार आहे? कोणत्या सोशल मीडियाचा वापर करणार? याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यम संनियंत्रण समितीकडून प्रमाणिकरण करून मगच ती पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. मात्र, अशा पोस्ट व्हायलर करण्यापूर्वी उमेदवारांनी तूर्तास तरी परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.

… तर कारवाई होणार कधी?
उमेदवारी अर्ज दाखल होऊनही सोशल मीडियावर पोस्ट किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी घ्यायच्या प्रमाणीकरणासाठी उदासीनता दिसून येत आहे. मुळात अनेक उमेदवारांच्या या निवडणूक कामकाजात सोशल मीडियासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे. तरी या प्रमाणीकरणात अनेक उमेदवार मागे आहेत. मंजुरी न घेताच उमेदवारांनी जाहिरात किंवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यांना आयोगाच्या सूचनेनुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।