गोपीनाथराव मुंडे हे परळीचं सौभाग्य, ते टिकवून ठेवण्यासाठी खंबीर साथ द्या –

60

गोपीनाथराव मुंडे हे परळीचं सौभाग्य, ते टिकवून ठेवण्यासाठी खंबीर साथ द्या –

 

ना. पंकजाताई मुंडे यांचा मुंबईत परळीतील आपल्या माणसांशी थेट संवाद

 

पालिकेत राष्ट्रवादीला साथ दिली, पण त्यांनी शहराचे वाटोळे केले

 

मुंबई दि. १३ —- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे परळीच सौभाग्य आहे,मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हे सौभाग्य पुसून टाकण्याच्या मागे लागले आहेत, हे सौभाग्य टिकवून ठेवण्यासाठी माझ्या मागे खंबीरपणे तुम्ही उभे रहा असे आवाहन करीत राज्याच्या ग्रामविकासमंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केले.

 

ना. पंकजाताई मुंडे यांनी आज चेंबूर येथे परळी मतदार संघातील आपल्या माणसांशी थेट संवाद साधला, त्यावेळी आयोजित स्नेही जणांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आपल्या लाडक्या लेकीचे चेंबुरकरांनी अभूतपूर्व स्वागत केले करण्यात आले.  या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

 

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,  गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना मी कोणाची व्यक्तिगत कामे केली की नाही माहीत नाही पण विकास करताना गावाचा,मतदारसंघाचा अन राज्याचा विचार केला. माझ्यावर माझ्या भावनेचा आरोप केले,राष्ट्रवादी ने आमचं घर फोडलं मात्र गेल्या पाच वर्षात मी कधीही त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही .कोणाला धमकावणे, दम देणे हे माझे काम नाही. परळीच्या जनतेच्या सेवेसाठी मी पाच वर्षे अहोरात्र काम केले. माझ्या प्रचारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत हे माझे अन तुमचे भाग्य आहे,मात्र यातही विरोधक टीका करीत आहेत. परळी मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून औद्योगिक क्रांती करण्यासाठी मोदी येणार आहेत,तेव्हा माझ्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

 

परळीचे वाटोळे करणारांना थारा देऊ नका

———————————–

गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवार असो की महिला बचतगट या माध्यमातून मी विकास केला,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हजारो किलोमीटर चे रस्ते केले,सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी मी काम केले,विरोधकांनी केवळ आरोप केले. परळीची जनता हुशार आहे,त्यांनी नगर पालिका असो की इतर लोकल च्या निवडणुका त्यांना विजय दिला मात्र त्यांनी शहराच वाटोळं केलं,आता मला पुन्हा पाच वर्षे संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुंबई मित्र मंडळाचे अध्यक्ष फुलचंद आघाव, भाजपचे ज्येष्ठ नेते गणपत आघाव, राजू आघाव, तुकाराम दराडे, अरूण इंगळे, बाळू भदाडे, मधुकर फड, गजेंद्र तांदळे, प्रकाश आलट, बाळू सानप आणि वैद्यनाथ सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।