घराणे शाही वाल्या पक्षाच्या प्रचार रॅली मध्ये महिलांचा अत्यल्प प्रतिसाद……..!

0
1170
Google search engine
Google search engine

 

शेगांव / संग्रामपूर:- महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजले अर्थातच मिशन विधानसभा २०१९ साठी सगळे पक्ष, पक्ष्याध्यक्ष , नेते मंडळी त्यांना उत्साह देणारे कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागलीत.
नामांकन अर्ज भरल्या गेले अर्ज भरतांना शक्ती प्रदर्शन केल्या गेली माझ्या माघे किती लोक असे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवारांकडून थोड्याफार प्रमाणात का होईना झालाच काहींनी खूप गाजावाजा करीत अर्ज दाखल केला तर काहींनी अल्प सवंगड्या समवेत निवडणूक अधिकारी कडे अर्ज भरला पण आता खरी वेळ आली ती फक्त गाजावाजा करण्याची दुसर्यांपेक्षा मी किती सरस हे जनतेपर्यंत पोहचविण्याची म्हणजेच प्रचार…
आपल्या मतदार संघात आपल्या पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते यांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार आपला प्रचार ताफा गावा गावात, खेड्या पाड्यात सुरू केला. या प्रचारात ही काही उमेदवार माघेपुढे दिसतातच. काही पक्ष वाऱ्या सारखा प्रचार करतात तर काहींचा वाऱ्यावर आहे असच वाऱ्यावर असण्याचे चित्र जळगांव जामोद, संग्रामपूर, शेगांव तालुक्यात एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला उमेदवारचं दिसत आहे काही नवीन नाही तेच जून दिशा व दशा “जैसे थे”चं
मतदार संघामध्ये ‘ह्या’ पक्ष्याचे उमेदवार त्यांच्याच पक्षाच्या पावलावर पाऊल टाकत आल्याचे स्पष्ट दिसून येते त्याची प्रचिती म्हणजे आता जे तिकीट वाटप झाले त्यात घराणेशाही चा प्रभाव दिसून आला.
दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर ही घराणेशाही आणि गल्लीत सुद्धा घराणेशाही च वडील आमदार आणि आता लेक उमेदवार महत्वाची बाब म्हणजे प्रचार सुरू आहे कार्यकर्ते यांचा सहभाग जेवढा जास्त तेवढा प्रचार भक्कम असा सामान्यतः म्हटले जाते पण उमेदवार स्वतः महिला पण प्रचारात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती मात्र कमी म्हणावे तर कुठे ? आणि जास्त म्हणावे तर किती ? अश्या अत्यल्प प्रतिसादाला यांच्या रॅली ला तोंड द्यावे लागत आहे. कदाचित महिलांनी आपला जण प्रतिनिधी हा फक्त विकास करणारा ठरवला असावा म्हणूनच घराणे शाही जोपासणाऱ्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीला दांडी मारलेली असावी असे दिसून येते.
आता हे पाहणे गरजेचे आहे की ज्यांनी आपले आयुष्याचे पक्षासाठी दिले पण त्याचा हाती नेहमी निराशाच पडते आता त्याची भूमिका काय..?