निवडणूक विषयक खर्च सादर न केल्यामुळे 6 उमेदवारांना नोटीस

0
523
Google search engine
Google search engine

अकोट : ता.प्रतिनीधी
निवडणूक निरीक्षक(खर्च) यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने अकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्च विषयक लेख्यांची तपासणी केली यामध्ये एकूण सतरा (17) उमेदवारांपैकी सहा (६) उमेदवारांनी अद्याप पर्यंत निवडणूक खर्च विषयक लेखे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष सादर न केल्यामुळे या सहा उमेदवारांना नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या या उमेदवारांमध्ये
अशोक किसनराव थोरात (अपक्ष), जितेंद्र बसवंत साबळे (अपक्ष), प्रमोद रामचंद्र खंडारे (अपक्ष), संतोष सूर्यभान देऊलकर (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), तुषार नाजूकराव पुंडकर (प्रहार जनशक्ती पार्टी), गजानन शांताराम तायडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना) यांना अशी आशयाची नोटीस दिल्याचे निवडणूक विभागाकडून काळविण्यात आले आहे.