मध्यस्थी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
702
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था द्वारा कार्यगठीत मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाच्या विवाह इच्छूक युवक युवतींचा व त्यांचे पालकांचा मेळाव्याचे शनिवार दिनांक २नोव्हेंबर २०१९ ला श्री क्षेत्र श्रद्धासागर आकोट येथे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती मंडळाध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी दिली.

मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाची सभा नुकतीच पार पडली या सभेत समाजातील सर्वस्तरातील मुला मुलींचे विवाह योग सहज व सुलभतेने जुळवून यावेत.यादृष्टीने विविध कार्यक्रम व उपक्रम ठरविण्यात आले.वधू-वर नोंदणी मोहीम,दर रविवारी सोयरिक बैठक,वधू-वर परिचय मेळावा,परिचयपुस्तिकेच्या वार्षिकांकाचे प्रकाशन,आदर्श विवाह केंद्र तथा मध्यस्थी दिनदर्शिकेचे प्रकाशन आदीं उपक्रम राबविण्यात येणार असून विवाहविषयक तत्पर सेवा पुरविण्यात येणार आहेत.वर्षभराचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहेत
सभेला मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे,डी ओ म्हैसणे,महादेवराव सावरकर,नागोराव कुलट,विलासराव चोरे,बाळासाहेब भांबुरकर ,प्रा.साहेबराव मंगळे,नंदकिशोर हिंगणकर ,शोभाताई म्हैसणे,वृंदाताई मंगळे,मधुकरराव पुंडकर,सुधाकरराव हिंगणकर , गजानन वालसिंगे,गजानन महल्ले, राममुर्ती वालसिंगे,रामदास मंगळे,महादेवराव बोरोकार आदी उपस्थित होते.
————————-